आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Siddharam Patil Selected For Shivabaratn Award Solapur

सिद्धाराम पाटील, रामशास्त्री म्याना यांना ‘शिवबारत्न’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शिवबा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने देण्यात येणार्‍या शिवबारत्न पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. सोमवारी (दि.24) सायंकाळी 6 वाजता फडकुले सभागृहात होणार्‍या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धूल यांनी दिली.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना गौरवण्यात येते. यंदा ‘दिव्य मराठी’चे वरिष्ठ उपसंपादक सिद्धाराम पाटील यांची आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच रामशास्त्री म्याना (जीवनगौरव पुरस्कार), अँड. महिबूब कोथिंबीरे (समाजभूषण पुरस्कार), यशवंत सादूल (छायाचित्रकार), काशिनाथ भतगुणकी, ड्रीम फाउंडेशन (सामाजिक पुरस्कार), मीना ना. लवटे, पूजा कदम, शोभा पाडळे, रामचंद्र धर्मसाले, संभाजी पवार, कुबेर शिंदे (आदर्श शिक्षक पुरस्कार) यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. डॉ. शिवरत्न शेटे यांच्या हस्ते आणि र्शमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, प्रा. अजय दासरी, अँड.गाजोद्दीन यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल. पत्रकार परिषदेस गुरुबाळा तावसे, प्रमोद सलगर, गुरुशांत धुत्तरगावकर, व्यंकटेश बोद्धूल, वासू आडम उपस्थित होते.