सोलापूर - सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर मंदिराला सोनेरी- चंदेरी साज चढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराचा घुमट आणि गाभारा चांदीने मढवण्यात येणार आहे. सिद्धरामेश्वरांचे जीवनप्रसंगही या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. याकरिता ५०० किलो चांदी लागणार असून कोटी ९२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. कर्नाटक पुणे येथील नामवंत कलावंतांनी नुकतीच मंदिराची पाहणी करून नक्षीकाम कलाकुसरीसाठी मोजमाप घेतले आहे.
अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर सुवर्ण सिध्देश्वर मंिदराची संकल्पना ‘दिव्य मराठी’ने मांडली होती. त्याची दखल घेत सिध्देश्वर देवस्थानच्या वतीने हे काम हाती घेतले आहे. सोलापुरातील भाविकांचा मदतीचा आेघही वाढत आहे. त्यानुसार मंदिराला सोने-चांदीचा साज चढवण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार देशातील नामवंत नक्षीकाम करणार्या बोलावून मंदिराचे मोजमाप घेण्यात आले आहे.अवघ्या काही दिवसात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिराला सोनेरी रूपेरी साज चढणार आहे.
नामवंतकलाकारांनी दिली भेट
सोने-चांदीचेनक्षीकाम, कलाकुसरीसाठी प्रसिद्ध असलेले पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ अप्पा हलवाई यांनी सिध्देश्वर मंदिराची पाहणी करून मंदिर आणि गाभार्याचे मोजमाप घेतले आहे. तसेच भारतातील प्रसिद्ध मंदिरांचे नक्षीकाम करणारे कर्नाटकच्या शिरसी भागातील कलावंत प्रकाश रेवणकर यांनी मंदिराचा गाभारा घुमटाचे मोजमाप घेतले आहे. याशिवाय इतर नामवंत कलाकारांनीही मंदिराचे नक्षीकाम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
लवकरच कामाची सुरुवात होईल
मंदिराचे रूपडे बदलण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. नागरिकांचा मदतीचा ओघही भरपूर आहे. बोलण्यापेक्षा कृती करून सांगावे अशी माझी भूमिका आहे. मंदिराच्याआतील विकासकामे आम्हास करण्याचा अधिकार आहे, परिसरातील कामे जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने सुरू आहेत. सुवर्ण सिद्धेश्वर संकल्पना सुंदर आहे. अवघ्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. धर्मराज काडादी, मंदिर समिती अध्यक्ष
दगडी बांधकामाला हात न लावता नक्षीकाम
मंदिर खूप पुरातन असल्याने त्याच्या दगडी बांधकामास हात न लावता हे काम करावे लागणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा जातीवंत टिकवूड सागवानात कोरीव काम करून त्यावर २४, २५, २८ अशा विविध गेजच्या पत्र्यांनी नक्षीकाम करावे लागेल. तसेच बाह्यभागात डिप कार्विंग नवरंग प्रकारातून सिद्धरामांच्या जीवनचरित्रावर आधारित भित्तीचित्रे याच चांदीत करता येऊ शकतात. तसेच शुद्ध चांदीच्या ३० किलोंच्या विटाच मुंबईतून एकदम खरेदी केल्याने दरही परवडेल.- प्रकाश रेवणकर, कलावंत
५०० किलो चांदी, 1 किलो सोने
सोन्याचा अंदाज कामावेळीच
मंदिरातील घुमटाच्या अंतर्गत भिंतीवर साकारण्यात येणार्या श्री सिद्धरामांच्या जीवनचरित्र भित्तीचित्रात सोन्याचे काम होणार आहे. त्या चित्रात किती सोने लागेल याचा अंदाज त्या वेळीच येईल
.
रेवणकर यांनी केलेली कामे
कर्नाटकातीलरेवणकर यांना मंदिराचे नक्षीकाम करण्याचा बराच अनुभव आहे. मंजूनाथ मंदिर (धर्मस्थळ) रेवणा विमलेश्वर देवस्थान (गोवा), नवदुर्गा देवस्थान (बोरी), दत्त मंदिर (शिरोडा), महालक्ष्मी मंदिर देवस्थान (कारवार), रंगनाथ मंदिर(बंगळुरू), लक्ष्मीश्वर देवस्थान (बदनी) , दुर्गम्मा मंदिर देवस्थान (दावणगिरी), व्यंकटरमणा देवस्थान (मंगळुरू), श्रीक्षेत्र गणपती (इडगुंजी), कोचांडी म्हाळसा देवस्थान (मंगळुरू), श्री लालखी (धर्मस्थळ) घुमटाच्या आतील सभामंडपास जवळपास १५० किलो तर घुमटाच्या सभामंडपास ३५० किलो चांदी अशी एकूण ५०० किलो लागणार आहे.
- चांदीचा किलोचा चालू भाव ३८ हजार रुपयांच्या आसपास आहे. याप्रमाणे ५०० किलो चांदीस अंदाजे १ कोटी ९२ लाख रुपये लागतील.