आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरकरांची मागणी पूर्ण; आता 22 डब्यांची ‘सिद्धेश्वर’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर- मुंबई दरम्यान धावणार्‍या 'सिद्धेश्वर एक्स्प्रेस'चे डबे वाढविण्यास रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता येत्या एक जुलैपासून सिद्धेश्वर एक्स्प्रेस 22 डब्यांची होणार आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांची चांगली सोय होणार आहे.

जे डबे वाढणार आहेत. त्यात 1 एसएलआर, 1 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 1 वातानुकू लित द्वितीय श्रेणी यांचा समावेश आहे. रेल्वे विभागाने पिटलाईनचे व फलाट 1 च्या विस्तारीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. त्यानंतरच सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या डबे वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला.

अशी असेल डब्यांची रचना
दोन एसएलआर , दोन सर्वसाधारण, 12 शयनयान , दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, तीन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी वातानुकूलित.

सोलापूरकरांची मागणी पूर्ण झाल्याचा आनंद
रेल्वे मंत्रालयाने पूर्वी मंजूर केलेल्या 3 डबे वाढविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या निमित्ताने सोलापूरकरांची मागणी पूर्णत्वास जात आहे. ए. के. प्रसाद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक.

संयुक्त डबा बाजूला, द्वितीय श्रेणी जोडणार
सध्या वातानुकूलित प्रथम व द्वितीय श्रेणीचा संयुक्त डबा जोडलेला आहे. 1 जुलैपासून हा डबा काढण्यात येणार असून त्या जागी संपूर्ण द्वितीय श्रेणी वातानुकूलित डबा जोडला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.