आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेसमोर मृतदेह ठेवून नातलगांचे आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेचा सफाई कर्मचारी विजय साबळे कामावर असताना मरण पावले. त्यामुळे वारसदारास अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्याची मागणी करत नातलगांनी साबळे यांचा मृतदेह महापालिकेसमोर आणून ठेवला. पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर त्यांनी माघार घेतली. पाच तास चाललेल्या आंदोलनात नातलगांसह कागमार संघटनेचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

रविवारी साबळे सिद्धेश्वर तलावात पाय घसरून पडल्याने बुडाले. सोमवारी एकच्या सुमारास नातेवाइकांनी महापालिकेसमोर मृतदेह आणून ठेवला. अधिकार्‍यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मलेरिया विभागात मानधनावर नोकरी देण्याची हमी देण्यात आली. त्यावर नातेवाइकांचे समाधान झाले नाही. प्रभारी आयुक्त अशोक जोशी यांनी आयुक्त सावरीकर यांच्याशी चर्चा केली. पण, त्यात तोडगा निघाला नाही.

दरम्यान, मृतदेहाची विटंबना होत असल्याने पोलिसांनी गौतम कसबे, अशोक जानराव यांना नोटीस देण्याची तयारी केली. सायंकाळी सहाच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले.