आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Siddheshwar Temple Committee Decision The Temple

सिद्धेश्वर मंदिर कमिटीचा ‘वन टू नेचर’चा आराखडा, पर्यावरणपूरक वस्तूंनी वाढवणार सौंदर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या पुरातन मंदिराला अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचे रूप आणता येईल, अशी संकल्पना ‘दिव्य मराठी’ने मांडली. त्याला प्रतिसाद देत देवस्थान समितीनेही मंदिराच्या अंतर्गत भागात आहे त्या वास्तूस हात लावता अनेक आमूलाग्र बदल करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी आराखडा बनवला असून येत्या काही दिवसांत त्या कामाला सुरुवातही होईल, अशी माहिती सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी वास्तुरचनाकार शशिकांत गांधी यांनी दिली.

मंदिराच्या अंतर्गत भागात करण्यात येणारी सुधारणा विकास कामे मंदिर समितीकडून तर तलाव परिसर सुशोभीकरणाचे काम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. कमिटीने दीड ते दोन एकरांत विविध सुधारकामांचा एक आराखडा बनवला आहे. मंदिरात प्रवेश करण्याच्या अमृतलिंगापासून गाभारा, योग समाधी, दासाेह परिसर, जलकुंभ आदी भागात बदल होणार आहेत.

सजेलयोग समाधी
सिद्धरामांनीजिथे जिवंत समाधी घेतली त्या पवित्र योग समाधीवर प्रदूषणाचा परिणाम होऊ नये आणि आलेल्या पर्यटकांना समाधीच्या जवळ असल्याचा भास व्हावा यासाठी खास टफन ग्लासची पेटीच याभोवती बनवण्याचा मानस आहे.

सौंदर्यवृद्धीचा प्रकल्प
-प्रकल्पाला ‘वन टू नेचर’ म्हणण्याचे कारण की, सोयीसुविधा निसर्गाला ऐतिहासिक वास्तूला धक्का लावता करण्यात येणार आहेत. खास इंडोनेशियाच्या बाली येथून दगडी काँक्रिटची शिल्पे आणणार आहोत.” शशिकांतगांधी, गांधीअँड असोसिएट्स

रूपदेण्याचा प्रयत्न
-आपल्यामंदिरामध्ये सुवर्ण मंदिरापेक्षा खूप जमेच्या बाजू आहेत. परिसर विस्तीर्ण आहे सोबत निसर्गाची जोड आहे, याला अनुसरून चांगल्यात चांगले रूप देण्याचा प्रयत्न आहे. या आराखड्यात बदलही होऊ शकतात.” धर्मराजकाडादी, अध्यक्ष,सिद्धेश्वर पंच कमिटी

असा दिसेल परिसर
*ठिकठिकाणी कारंजे, कोरीव लाकडी पुतळे, पाषाण काँक्रिट शिल्पे, लाकडी पूल, िदवे आदी
* अमृतलिंगापासून मंदिरात प्रवेश केल्यावर एक कमळाचा ४० बाय ४० फुटांचे मोठे कारंजे
* पायी मार्गाच्या दुतर्फा घडी करता येण्यासारखे धातूचे खांब
* पितळ आणि तांबा या धातूत बनवलेले कमानीसह खांब
* ब्लॅक बेसॉल्ट फ्लेम्ड् ग्रॅनाइटचे पॉलिश लँप पोस्ट
* कमळाच्या कारंज्यात धुक्याचा इफेक्टसाठी फॉगची यंत्रणा
* पाय पोळू नयेत यासाठी शेड
* कमी प्रकाश देणारे संगमरवर दगडाचे कमी उंचीचे लँप पोस्ट
* दासोहसमोरील भूतलावावर येणार लाकडी पूल

हे बारकावे
*येथेयेणारी प्रत्येक वस्तू बारीक कोरीव काम केलेली असेल.
*या वस्तू मेंटेनन्स फ्री म्हणजे एकदा लावल्यावर त्यावर खर्च करावा लागणार नाही.
*उच्च प्रतीचा काळा बेसॉल्ट दगड निर्माणात वापरण्यात येईल.
*वुडन, काँक्रिट स्टोन कार्विंगचे उत्कृष्ट नमुने सर्वत्र लावले जातील.
मंदिरात प्रवेश केल्यावर योग समाधीच्या बाजूला धुक्याचे इफेक्ट देणारा बारीक तुषार उडवणारे असे कारंजे असेल.

सिद्धेश्वर मंदिर परिसर बदल केल्यावर असा दिसेल. गांधी असोसिएटसनी बनविलेला आराखडायात मंद प्रकाश देणारे कमी उंचीचे िदवे, लाकडी पूल आदी दिसत आहे.