आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण सिद्धेश्वर महाअभियान : चार लाख रोख, २९ किलो चांदी, ६१ तोळे सोने जमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सुवर्ण सिद्धेश्वर मंदिर मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठ दिवसांत चार लाख रुपये, २९ किलो चांदी तर ६१ ग्रॅम सोने जमा झाले आहे, अशी माहिती विश्वस्त मल्लिकार्जुन वाकळे यांनी दिली. देवस्थान समितीने मे रोजी या अभिनव प्रकल्पासाठी दान देण्याचे आवाहन केले होते.

सिद्धेश्वरांचे मंदिर अमृतसर येथील सुवर्ण मंदिरासारखे व्हावे अशी संकल्पना ‘दिव्य मराठी’ने मांडली. ही संकल्पना देवस्थान समिती पुढे नेत आहे. दान देण्याच्या आवाहनानंतर पहिल्या दिवशी २५ किलो चांदी आणि ४५ ग्रॅम सोने जमा झाले होते. त्यानंतर दरदिवशी यात भर पडत आहे.

सुवर्ण सिद्धेश्वर मंदिरासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन करणारे फलक सिद्धेश्वर मंदिर, बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर आणि विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.

बँकेतही रक्कम होतेय जमा
यासंकल्पनेसाठी सोन्या-चांदीसह रोख रक्कमही स्वीकारण्यात येत आहे. रक्कम जमा करण्यासाठी देवस्थान समितीने स्टेट बँक ऑफ इंडियामधील खाते क्रमांक (३४१७५८११२८०) दिले आहे. तिथेही भाविक रक्कम जमा करत असल्याचे सांगण्यात आले.

सिद्धेश्वर मंदिरात करण्यात येणार्‍या सोनेरीरूपेरी साजसाठी भाविकांनी दान करावे असे आवाहन करणारे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.