आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलईडी दिव्यांमुळे उजळणार सिद्धेश्वर मंदिराचे सौंदर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विस्तीर्ण जलाशयातील स्थान आणि एका बाजूस भुईकोट किल्ल्याची तटबंदी यामुळे देशात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या श्री सिद्धरामेश्वर मंदिराचे सौंदर्य आता आणखी खुलणार आहे. दोनच महिन्यांत ग्रामदेवतेचा मंदिर आणि परिसर एलईडी दिव्यांनी उजळणार आहे.
किल्ल्याच्या तटबंदीलगत खालून लावलेल्या दिव्यांनी तलावालगतची किल्ल्याची भिंत प्रकाशमय होईल आणि त्याचे तलावात पडणारे प्रतिबिंब भाविक आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. डोळ्याचे पारणे फेडणारे हे नयनमनोहर दृश्य असेल.

सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. एलईडी दिवे बसवण्याचे काम बजाज कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन दोन आठवडे झाले आहेत. सध्या किल्ल्यालगत भूमिगत वायरिंगचे काम बिहारी कामगारांकडून करण्यात येत आहे.
किल्ला परिसरातील फ्लड

संमती कट्ट्यापासून ते गणपती घाट या ४८० मीटर परिसरात ६० दिवे असतील.
मीटरच्या अंतरावर एक दिवा असेल.

दिवे खाली लावून त्याची दिशा किल्ल्याच्या भिंतीकडे ठेवल्याने किल्ला प्रकाशमय होईल आणि प्रतिबिंब तलावात उमटेल.

मंदिरालगतच्या तलावातील पायरीला एलईडी स्ट्रीप लाइट.
मंदिराच्या आतील बाजूस सर्वत्र एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत. दोन महिन्यांत काम पूर्ण होईल. रोहनकुमार, इंजिनिअर, बजाज कंपनी
रंगीबेरंगी दिवे शिखराला
एनटीपीसीकडून सिद्धेश्वर मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिरासाठी एक-एक हायमास्ट देण्यात आला आहे. दोन्ही हायमास्ट मंदिरात लावल्याने पटांगण प्रकाशमान होईल.

असे असतील मंदिरातील एलईडी दिवे

स्ट्रीप लाइट आतून भिंतीला
मंदिर परिसरात असे लागतील एलईडी दिवे.
मंदिर प्रवेशद्वारापासून एका बाजूने एलईडी स्ट्रीप लाइट असतील.
मंदिराच्या भिंतींवर बाहेरून ९८ अपडाऊन लाइट लावण्यात येतील.
बाहेरील भिंतींवर वरच्या बाजूने ७०० मीटर एलइडी स्ट्रीप लाइट.