आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर यात्रेत शोभेच्या दारूकामातून सामाजिक संदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ग्रामदैवत शिवयोगी श्रीसिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील शोभेच्या दारूकामाने सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले. दारूकामातून विविध सामाजिक संदेश देण्यात आले. रात्री साडेआठ वाजता होम मैदानावर जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुमंत कोल्हे, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. एम. ए. पटेल यांनी दिल्लीतील तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेवर आधारित ‘ज्योत मशाल व्हावी, दामिनी सशक्त व्हावी’, ‘मुली वाचवा’, ‘पाणी हेच जीवन, वापर करा जपून,’ असे संदेश शोभेच्या दारूकामातून दिले. वळसंगचे इरप्पा केशेट्टी, करमाळ्याचे उत्सव फायर वर्क्‍स, एम. ए. पटेल (सोलापूर), चौसाळ्याचे जय महाराष्ट्र फायर वर्क्‍स, आदित्य फायर वर्क्‍स (कराड, सातारा) यांनी दारूकामात सहभाग घेतला. बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी निवेदन केले. अग्निशामक दलाच्या बंबासह पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.असे दारूकाम

श्री सिद्धेश्वर मंदिराची प्रतिकृती, इंडिया गेट, भारताचा नकाशा, महादेव पिंड, पाण्याचा धबधबा, चांदण्या, कारंजे, त्रिवेणी संगम, तारामंडल, उगवता सूर्य, चारमिनार, ओम नम: शिवाय, सुरूचे झाड, कलर नागीण, श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेस दारूकामाने हार अर्पण, पृथ्वी, अशोकचक्र, सोनेरी झाड, डिजिटल तोफा, सुदर्शन चक्र, डिस्को झाड, मक्र्युरी लाइट आदी

हे ठरले विजेते
प्रथम : एम. ए. पटेल, सोलापूर,
द्वितीय : इरप्पा केशेट्टी, वळसंग,
तृतीय : उत्सव फायर वर्क्‍स, करमाळा