आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर यात्रा : सीसीटीव्हीचे जाळे विस्तारण्याची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर आणि धार्मिक विधी होणार्‍या परिसरात सीसीटीव्हीचे जाळे विस्तारण्याची आवश्यकता आहे.

यात्रा तोंडावर असून मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे 15 दिवसांपासून बंद आहेत. गेल्याच आठवड्यात ‘सिमी’शी संबंधित दोघा संशयितांना अटक झाली. यात्रा 12 जानेवारीपासून यात्रा सुरू होत आहे. सध्या 19 कॅमेरे आहेत. आणखी काही ठिकाणी भाडेतत्त्वावर कॅमेरे लावणे गरजेचे आहे. यात्रेत भाविकांची उपस्थिती लाखोंच्या संख्येत असते. यंदा सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा महत्त्वाचा बनला आहे.

यात्रेच्या तयारीची बैठक
मंदिर समिती, नंदीध्वज मानकरी व धारक यांची बैठक रविवारी मंदिरात झाली. विकासकामे आदींविषयी सूचना व तक्रारींवर चर्चा झाली. अक्षता सोहळ्यास एकच प्रवेश मार्ग असल्याने लक्ष्मी मंडई तसेच गणपती घाट येथील प्रवेशद्वार उघडावे, अक्षता वेळेवर पडाव्यात, कृषी प्रदर्शनात पूजा साहित्य व सिद्धरामेश्वरांची माहिती देणारे दालन असावे, होम मैदान कायमस्वरुपी स्वच्छ असावे अशा सूचना आल्या. आमदार विजयकुमार देशमुख, बाजार समितीचे उपसभापती राजशेखर शिवदारे, अनिल सिंदगी, सिद्धय्या स्वामी, गुरुलिंग तमाले, नरेंद्र गंभीरे, गुंडप्पा कारभारी, बाळासाहेब भोगडे, तम्मा गंभीरे, बाबूराव नष्टे, मल्लिनाथ जोडभावी, सोमशंकर देशमुख, महेश अंदेली, चिदानंद वनारोटे, नंदकुमार मुस्तारे यांच्यासह सुमारे 300 नंदीध्वज धारक उपस्थित होते.

कॅमेरे दोन दिवसांत सुरू
मंदिरात वायर बदलण्याचे काम सुरू आहे. तसेच मंदिरास सँड ब्लास्टिंगचे काम होत असल्याने हे कॅमेरे बंद ठेवले आहेत. सुरक्षारक्षक आहेत. कॅमेरे तर सुरू होतीलच. तसेच भाडेतत्त्वावर घेऊन महत्त्वाच्या ठिकाणीही कॅमेरे लावण्याचा विचार आहे. नंदीध्वजांसोबतही फिरते कॅमेरे लावण्याचा विचार आहे.’’ मल्लिकार्जुन वाकळे, अध्यक्ष, सिद्धेश्वर यात्रा समिती

नवरात्रातील अनुभव चांगला
नवरात्रामध्ये रुपाभवानी मंदिरात तात्पुरत्या स्वरूपात 15 कॅमेरे लावण्यात आले होते. तो प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले. दर्शनरांग आदी सोय करण्यात आली. यामुळे मंदिरात प्रवेश करणार्‍याची छबी कायमस्वरूपी मिळाली. ही तर मोठी यात्रा असते, येथे असे कॅमेरे लावणे अतिशय गरजेचेच आहे.’’ काळूराम धांडेकर, पोलिस निरीक्षक