आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Siddhivinayak Trust Offer One Crore Donation To Solapur For Jal Shivar

जल शिवारसाठी 'सिद्धिविनायक'ची सोलापूरला कोटी रुपयांची देणगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जलयुक्त शिवार अभियानला अधिक गती देण्याच्या उद्देशाने मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टने गुरुवारी सोलापूर उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाकडे प्रत्येकी एक कोटी रुपयांचा धनादेश दिला. न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी हा धनादेश उस्मानाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना सुपूर्द केला. रोहयो उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, न्यासाचे विश्वस्त प्रवीण नाईक, हरिश सनस, स्मिता बांद्रेकर धोंडिराम आरोळे आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सिद्धिविनायक ट्रस्टचा हा उपक्रम गौरवास्पद असल्याचे सांगत या उपक्रमात अधिकाधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवावा. कारण लोकसहभागामुळेच ही चळवळ अधिक यशस्वी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा कृषी अधीक्षक रफिक नाईकवाडी यांनी या जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील २८० गावांचा सहभाग असल्याची माहिती प्रास्ताविकात दिली.

पंढरपूर घाटाला मदत
श्री.राणे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानसाठी ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात येतील. पंढरपूर येथे इस्कॉनच्या वतीने चंद्रभागा नदीकिनारी बांधण्यात येणाऱ्या घाटाच्या बांधकामासाठी इस्कॉन संस्थेला सुमारे एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी ५० लाख रुपये दिले असून उर्वरित ५० लाख लवकरच दिले जातील.