आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व दिवे एकदम लागल्याने गोंधळ, भय्या चौकातील प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भय्या चौकात शनिवारी सकाळी हिरवा, लाल, पिवळा हे दिवे एकदम अखंडपणे सुरू होते. रामलाल चौकातून दमाणीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर जो सिग्नल खांब आहे त्याठिकाणी हे चित्र पाहायला मिळाले. काही वाहनधारकरक यामुळे गोंधळात पडले. कोण पुढे जात होता, कोण थांबत होता. अन्य तिन्ही बाजूला मात्र (पिवळा) दिवा बंद-चालू होत होता.

महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून सोलर यंत्रणेवर सिग्नल दिवे लावले. अद्याप ते नियमीत चालू नाहीत. या चौकात बॅरिकेडिंगची गरज आहे, अतिक्रमण आहे म्हणून वाहतूक नियोजन होत नाही. महापालिका ही सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलिसांच्या ताब्यात दिली नाही. पोलिसांच्या सूचनेनुसार अतिक्रमण काढणे, बॅरिकेडिंग लावणे हे काम त्यांनी करून दिले नाही. पोलिसही वाहतूक नियोजन करत नाहीत. सरस्वती चौकातील सिग्नल वायर रस्ता खोदताना तुटल्यामुळे महिनाभरापासून सिग्नल बंदच आहे.