आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोट्या गुन्ह्यात पोलिसांनी गोवले; लुंजे आणि दंडोती परिवाराने केला आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - इंदूर, औरंगाबाद, पुणे एटीएस पथकाने सिमीच्या कार्यकर्त्यांना मदत केल्याप्रकरणी म. सादिक अ. वहाब लुंजे, उमेर अ. हाफीज दंडोती यांना मंगळवारी अटक झाली. यापूर्वीच खालीद मुछाले याला अटक झाली आहे. ही अटक म्हणजे एटीएस पोलिसांनी बनावट कथानक तयार करून कायद्याची पायमल्ली केली, आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांच्या नातेवाइकांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

लुंजेला किडवाई चौकात अटक करून बेड्या घालून व बंदूक लावून घरी आणले. मी घरी एकटी होते. पोलिस मला बंदूक कुठे ठेवली आहे सांग, नाही तर कारागृहात तुलाही सडावे लागेल असे म्हणून धमकी देत होते. संपूर्ण खोलीतील साहित्याची उलथापालथ केली तेव्हा सादिकच्या सासर्‍यांनी जमीन विकून आणलेले दीड लाख रुपये त्यांना मिळाले. याशिवाय कोणतेही साहित्य सापडले नाही, अशी माहिती सनानाज सादिक लुंजे यांनी दिली. लग्नाअगोदर सादिक दुबईला नोकरीसाठी जाऊन आला आहे. अलीकडील काळात सोलापुरातच होता, असे त्या म्हणाल्या.

उमेर दंडोतीला रात्री सात वाजता मोबाइलद्वारे घराबाहेर बोलावून घेऊन पोलिस घेऊन गेले. ही घटना त्याच्या लहान भावाने पाहून घरी माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांत जाऊन चौकशी केल्यानंतर उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. पहाटे दोनच्या सुमाराला उमेरच्या अटकेची सूचना कागदावर मिळाली. दुसर्‍या दिवशी बातमीच्या माध्यमातून घरातून डिटोनेटर, पिस्टल, जिलेटीन कांड्या, काडतुसे जप्त केल्याचे कळले. पोलिस कसे मनमानी करतात यातून स्पष्ट झाल्याचे अ. हाफीज दंडोती यांचे म्हणणे आहे.

मुछालेचा पोलिस छळ करत होते : खालीद मुछाले जानेवारी 2013 मध्ये जामिनावर आला. तेव्हापासून एमअयडीसी पोलिसांच्या संपर्कात होता. तीन महिन्यांपासून पुणे एटीस पथक त्याला फोन करून पुण्याला बोलावित होते. सोलापूरला येऊन मानसिक छळ करीत होते. 18 डिसेंबर रोजी त्याला एमआयडीसी पोलिसांनी बोलाविले. तो आपली दुचाकी घेऊन गेला. त्यानंतर आलाच नाही. याबाबत मिसिंगची तक्रार नोंदली. 25 डिसेंबर रोजी त्याला अटक झाल्याची माहिती वाचनात आली, असे इरफान अहमद मुछाले म्हणतात.