आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापुरा/ भोपाळ - सोलापुरातून पकडलेल्या सिमीच्या दोन संशयितांना मध्य प्रदेशातील न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले . दरम्यान, मध्य प्रदेश तसेच अन्य ठिकाणांहून पकडण्यात आलेल्या सुमारे 32 संशयितांच्या संदर्भातील सर्व प्रकरणे भोपाळच्या न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिले.
दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीन व बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट (सिमी) या दहशतवादी संघटनांशी संबंधित अबू फैझल व त्याच्या साथीदारास सेंधवा ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण एटीएसने भोपाळकडे वर्ग केले आहे, तर चार दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात पकडलेल्या सादिक अब्दुल वहाब लुंजे व उमेद हाफिज दंडोती यांना भोपाळच्या न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
खालिदवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
24 डिसेंबरला सेंधवा येथील नवलपुरा भागात झालेल्या चकमकीनंतर अबू फैझल व खालिद अहमद (सोलापूर) तसेच महिदपूर येथील इरफान नागैरी यांना अटक केली होती. त्यांच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.