आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Singer Anand Madagulakara News In In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिकांच्या हृदयात ‘गदिमां’चे स्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दोनहजारहून अधिक चित्रपटगीते, भावगीते लिहिणारे ग. दि. माडगूळकर यांना जाऊन ४० वर्षे होत आहेत. तरीही रसिकांच्या हृदयातील त्यांचे स्थान कायम आहे, असे ख्यातनाम गायक आनंद माडगूळकर (पुणे) यांनी येथे सांगितले. सिद्धेश्वर सहकारी बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यानमालेस गुरुवारपासून सुरवात झाली. त्याचे पहिले पुष्प श्री. माडगूळकर यांनी गुंफले. ‘गदिमायन’ या विषयावर त्यांनी ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांची सफर घडवली. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वा. का. किर्लोस्कर सभागृहात हा कार्यक्रम झाला. गदिमांच्या आठवणी, त्या वेळचे प्रसंग रसिकांच्या डोळ्यासमोर उभे करून आनंद माडगूळकर त्यांच्या गाणी गात होते.
यांची उपस्थिती
बँकेचेमार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. या वेळी बँकेचे अध्यक्ष सुभाष मुनाळे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, मुख्य कार्यकारी अधिकारी राम शर्मा आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.