आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात आज, उद्या तालवाद्यांची सुश्राव्य मैफल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूरच्या संगीत क्षेत्रातील दिगंबरबुवा कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीने शनिवारी आणि रविवारी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तालवाद्य कलावंतांची सुश्राव्य संगीतसंध्या आयोजित करण्यात आली आहे. सरस्वती मंदिर प्रशालेत हा कार्यक्रम होईल.

शनिवारी सायंकाळी 6 वाजता अनुपमा भागवत यांचे सतारवादन होईल. पद्मविभूषण पंडित किशनमहाराज यांचे शिष्य, वाराणसीचे सुप्रसिद्ध तबलावादक पंडित पुंडलिक भागवत यांचा स्वतंत्र तबलावादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या सोबतीला र्शेयश कुरूरकर यांचे तबला सोलो वादन होईल. व्यंकटेश संगीत विद्यालयाचे संतोष कुलकर्णी यांचा हार्मोनियम वादनाचा तर मिरजच्या प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका स्मिता महाबळ यांचे गायन होईल. रविवारी सायंकाळी 6 वाजता सोलापूरच्या पूजा राव यांचे मेंडोलिन वादन होईल. पुंडलिक भागवत हे तबल्यावर साथसंगत करणार आहेत. श्रीनिवास काटवे भरतनाट्यम सादर करतील.

असे आहेत कलावंत-
पंडित पुंडलिक भागवत (वाराणसी) : सुप्रसिद्ध तबलावादक. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग. विविध दिग्गजांच्या गायनाला साथसंगत.

स्मिता महाबळ (मिरज) : शास्त्रीय संगीत गायिका. देशातील विविध भागांसह परदेशातही मैफली सादर केल्या आहेत.

पूजा राव (सोलापूर) : देशातील विविध भागांसह परदेशात कला सादर करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. अनेक ठिकाणी प्रयोग झाले.

अनुपता भागवत (बंगळुरू) : देशभरात अनेक कार्यक्रम केले आहेत. इटली, अमेरिका, फ्रान्स, लंडन येथे सादरीकरण केले आहे.