आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sinhgad College Student Making Answer Paper Checking Application

सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी बनविले उत्तरपत्रिका तपासणीचे "अॅप्लिकेशन'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विद्यापीठ,काॅलेज अथवा कोणत्याही शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची प्रक्रिया सुरू होते ती म्हणजे उत्तरपत्रिका तपासणी करण्याची. अतिशय वेळखाऊ किचकट प्रक्रिया असलेल्या या पद्धतीवर सिंहगड अभियांत्रिकीतील बी.ई. (सीएससी) मधील विद्यार्थ्यांनी स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी खास अॅप्लिकेशन प्रोजेक्टअंतर्गत तयार केले आहे. "डिझायनिंग वेब अॅप्लिकेशन फॉर युनिव्हर्सिटी पेपर अॅसेसमेंट सिस्टीम' असे त्या प्रोजेक्टचे नाव आहे. विद्यार्थी मितेश भोसले, राघवेंद्र नायडू महेंद्र थोरात यांनी मार्गदर्शक प्रो. ए. व्ही. मोफरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट यशस्वी पूर्ण केला.

विद्यापीठअशा अॅप्लिकेशनच्या शोधात :
सध्याउत्तरपत्रिका तपासणीचे नवे वेब डिझाइन बनवून घेण्यासाठी विद्यापीठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नुकताच एमसीए इंजिनिअर या अभ्यासक्रमातील एका पेपरच्या तपसणीसाठी बाहेरच्या कंपनीकडून अॅप्लिकेशन तयार करून घेतले. मात्र त्यात त्रुटी आढळल्याने विद्यापीठ नव्या डिझायनिंगच्या शोधात आहेच.

पारंपरिकतपासणी पद्धत बदलेल :
सध्यापारंपरिक पद्धतीने उत्तरपत्रिका कॅप सेंटरमध्ये तपासल्या जातात. उत्तरपत्रिका गोळा करणे, प्रत्येक उत्तरपत्रिकेवर मास्किंग करणे, प्रत्येक उत्तरपत्रिकेला बारकोड देणे, (ओळख गुप्त ठेवण्यासाठी उत्तरपत्रिकांना मास्किंग करावे लागले) उत्तरे तपासणे, गुण देणे, गुणांची बेरीज करणे यात मानवी चुका होण्याची शक्यता असते. मात्र विद्यार्थ्यांनी बनवलेल्या अॅप्लिकेशनमध्ये या सर्व पायऱ्या संगणकाच्या साह्याने बिनचूक पार पाडता येतात. कोणत्याही लेखी उत्तरपत्रिका या वेब अॅप्लिकेशनद्वारे सहज तपासता येतील. निकाल त्वरित देता येतील. मानवी हस्तक्षेप राेखला जाईल.

तांत्रिक आवश्यकता :
संगणक विंडोज ७, किंवा एक्सपी, प्रोग्रॅमिंग लँग्वेज - जावा, जेएसपी, एचटीएमएल, मायसोल, कॅप सर्व्हर, इव्हॅल्यूएटर सिस्टिम, लॅन केबलचा उपयोग करून अॅप केले आहे.

तर विद्यापीठ स्वीकारेल
सोलापूरविद्यापीठ अशा अॅप्लिकेशनची विविध पातळीवर चाचणी घेत आहे.यापूर्वी असा प्रयत्न झाला आहे. या अॅप्लिकेशनची उपयुक्तता वाटल्यास विद्यापीठ निश्चित स्वीकारेल.alt148 बी.पी. पाटील, परीक्षा नियंत्रक

काय फायदा
पेपरतपासणीचे असे अॅप्लिकेशन मिळाल्यास विद्यार्थ्यांना त्वरित निकाल मिळू शकतो. त्वरित फोटोकॉपी मिळेल. गुण पडताळणी करता येईल. मानवी हस्तक्षेप नसल्याने निर्दोष तपासणी शक्य.

पेपर तपासणीत येईल पारदर्शकता
उत्तरपत्रिकास्कॅन करायच्या. त्यांना टोकण कोड द्यायचे आणि मग ते इनस्क्रिप्शन (गुप्त कोड संकलन) करून पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांकडे ऑनलाइन पद्धतीने पाठवायचे. तपासलेल्या उत्तरपत्रिका निकालानंतर विद्यार्थ्यांनाही सहज उपलब्ध होऊ शकतात. यातील प्रत्येक टप्प्यात जर कोठे चूक झाली तर लगेच निदर्शनास येईल. पेपर तपासणी प्रक्रियेत पारदर्शकपणा येईल. फोटोकॉपीही त्वरित देता येईल.

फोटो - सिंहगड अभियांत्रिकीमधील बी.ई.तील विद्यार्थी मितेश भोसले, राघवेंद्र नायडू, महेश थोरात मार्गदर्शक प्रा. ए.व्ही. मोफरे वेब डिझाईनिंग प्रकल्प पूर्ण करताना.