आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही फुटेजमुळे युवकास जामीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - 2 तरुणांच्या त्रासाला व विनयभंग झाल्यामुळे एका तरुणीने पेटवून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तरुणासह तिघांवर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. घटनेदिवशी तरुण जुन्नूर तालुक्यात होता. तर त्याचा भाऊ रेल्वे विभागात कामावर होता. सीसीटीव्ही चित्रफीत न्यायालयात हा पुरावा म्हणून सादर केल्यामुळे उच्च न्यायालयाने तरुणाला जामीन मंजूर केला.

बनावट गुन्हा दाखल केल्याचे यामुळे उघडकीस आले आहे. 13 जुलै 2013 रोजी तरुणीने पेटवून घेतले. तिच्या वडिलांनी फिर्याद दिल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. सोलापूर न्यायालयाने तरुणाच्या भावाला जामीन दिला. पण, तरुणाचा अर्ज फेटाळला. अ‍ॅड. जयदीप माने यांच्यामार्फत तरुणाने उच्च न्यायालयात धाव घेतली.

तो जुन्नूर तालुक्यात एका कॉलेजात शिकायला आहे. तिथल्या एटीएम सेंटरमध्ये तो पैसे काढताना सीसीटीव्हीमध्ये ते चित्रीकरण झाले होते. न्यायालयात तो पुरावा म्हणून सादर करण्यात आला. त्यानुसार मोहोळ पोलिसात त्याला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पोलिसात हजर राहून त्याला जामीन मिळाला.