आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंगायत समाजातील नवयुवकांनी समाजकार्यासाठी पुढे येण्याची गरज- शिवदारेंचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महाराष्ट्रात लिंगायत समाज सोलापुरात सर्वांत जास्त आहे. समाजातील युवकांनी समाजाच्या समाजाकार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी रविवारी येथे केले.
वीरशैव लिंगायत युवक प्रतिष्ठानच्या समाजबांधव स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. तो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रविवारी सायंकाळी झाला. मंचावर सिद्धय्यास्वामी हिरेमठ, डॉ. किरण देशमुख, माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार, बसवराजशास्त्री हिरेमठ, उत्कर्ष शेटे, गुरुनाथ बडुरे, प्रकाश वाले आदी होते.
शिवदारे म्हणाले की, हेतू एक नेक असेल तर भेदभावाला थारा नसतो. सेवा करण्याची अपेक्षा तरुणांकडूनच आहे. ती त्यांनी पूर्ण करावी. आपल्यातील उत्साहाचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा.

शिवदारे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानतर्फे भविष्यात होणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. व्यसनमुक्ती मोहीम, गरजूंना २० हजार वह्यांचे वाटप आदीचा समावेश होता.

संस्थेचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, सिद्धाराम बावकर, श्रीकांत हावळगी, संजय सिंदगी, जगदीश लिगाडे, दिनेश उपासे, गुरुनाथ निंबाळे, जयराज नागणसुरे, वीरशैव व्हीजनचे राजशेखर बुरकुले, नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, शिवानंद पाटील, चंद्रकांत रमणशेट्टी, प्रकाश वाले, सुभाष मुनाळे, रतन रिक्के, गिरीश मंद्रूपकर, शशिकांत तळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले. श्रीकांत हावळगी यांनी प्रास्ताविक केले.
बातम्या आणखी आहेत...