आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sivajayanti Rally News In Marathi, For Rally Root Issue, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवजयंती मिरवणुकांमुळे वाहतुकीच्या अनेक मार्गांत बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरात बुधवारी शिवजयंतीच्या मिरवणुकीमुळे काही वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी काही प्रमुख मार्ग या काळात बंद करण्यात आलेले आहेत. आत्यंतिक गरज असेल तरच त्या मार्गांचा वापर करावा. अन्यथा पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन साहाय्यक पोलिस आयुक्त मोरेश्वर आत्राम यांनी दिली.

मिरवणूक काळात शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त असणार आहे. त्यांना अल्पभोजन देण्याची व्यवस्था सोलापूर युवक प्रतिष्ठानने केली आहे. दुपारी 12 वाजता नवी पेठेतील पारस इस्टेट येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राज सलगर यांनी दिली. या उपक्रमातून सुमारे 700 पोलिसांना आहार पुरवला जाईल.

मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शिवरॅली
शहरातील मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शिवरॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता रंगभवन चौकातून रॅलीचा प्रारंभ होणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रात्री 12 पर्यंत परवानगी
यंदा शहरात शिवजयंती मोठय़ा प्रमाणात साजरी करण्यात येत आहे. शिजन्मोत्सव साजरा करणार्‍या मंडळांची संख्या वाढली आहे. तसेच जवळपास 25 मंडळे यंदा सवाद्य मिरवणुका काढतील, असा अंदाज आहे. बुधवारी दुपारी दोननंतर मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. लेझीम, ढोलसह दिमाखात निघणार्‍या या मिरवणुका रात्री 12 वाजेपर्यंत होतील. नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे. लहू गायकवाड, अध्यक्ष, मध्यवर्ती उत्सव समिती

हे आहेत शहरातील पर्यायी मार्ग
1. सात रस्ता ते मोदी पोलिस चौकी - रेल्वे स्टेशन - भय्या चौक - कल्पना चित्रपटगृह - निराळे वस्ती - हॉटेल अँम्बेसेडर - ते बसस्थानकाकडे किंवा जुना पुणे नाकामार्गे पुण्याकडे अथवा महामार्गावरून शहरात.

2. सात रस्ता ते रंगभवन चौक - सिव्हिल चौक - पोटफाडी चौक - व्हिवको प्रोसेस - शांती चौक - जुना बोरामणी नाका - मड्डी वस्ती - जुना तुळजापूर नाकामार्गे जुना पुणे नाका किंवा पुढे शहरात.

मिरवणूक मार्ग डाळिंबी आड ते चौपाड
‘मध्यवर्ती’चा हा आहे मार्ग : शिंदे चौकातील डाळिंबी आड येथून मिरवणुकीस सुरुवात होईल. तेथून सरस्वती बुक डेपो - नवी पेठ - पारस इस्टेट - मेकॅनिक चौक - पांजरपोळ चौक - महात्मा गांधी रस्ता - तरटी नाका पोलिस चौकी - बाळीवेस - टिळक चौक - मधला मारुती - माणिक चौक - कसबा चौकी - खाटिक मशीद - दत्त चौक - राजवाडे चौक - जुने विठ्ठल मंदिर - चौपाडमार्गे डाळिंबी आड येथे विसर्जन.