आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sixteen Thousand Student Not Attained Railway Exam

तब्बल 16 हजार जणांनी मारली रेल्वे परीक्षेस दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रेल्वे भरती परीक्षेस तब्बल 16000 जणांनी दांडी मारली. केवळ 3900 जणांनी परीक्षा दिली. रेल्वे भरती मंडळाची परीक्षा रविवारी झाली. सोलापुरातील 20 केंद्रांतून सुमारे 19600 जणांची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी रामचंद्र बरकडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

गँगमन, सफाईवाला, हेल्पर आदी पदांसाठी ही परीक्षा झाली. दरम्यान, अनुचित प्रकार घडला नाही. सोलापूरसह गुलबर्गा येथे व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली होती. गुलबर्गा येथे दोन केंद्रे होती. केंद्रावर रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापक के. मधुसुदन, वरिष्ठ विभागीय दळण-वळण व्यवस्थापक सुशील गायकवाड, र्शी. बरकडे, वरिष्ठ विभागीय संरक्षक अधिकारी चंद्रमोहन अधिकारी आदींनी भेट दिली.