आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहावा वेतन आयोग केंद्र शासनानुसार लागू करावा; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भडकुंबे यांना निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आरोग्य सेवेतील शासकीय औषधनिर्माण अधिकारी यांना सहावा वेतन आयोग केंद्र शासनानुसार लागू करा, या व इतर प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हा परिषदेसमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भडकुंबे यांनी शासनस्तरावर मागण्या पोहोचवणार असल्याचे आश्वासन दिले. या वेळी 150 ते 200 कर्मचारी सहभागी झाले होते, तर सिव्हिलमधील कर्मचार्‍यांनी धरणे आंदोलनास पाठिंबा दिला असून, काळ्या फिती लावून काम केले.
मागण्यांबाबत वारंवार विचारणा केली असता केवळ आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे औषधनिर्माण अधिकारी संवर्गात प्रचंड असंतोष वाढला असून आमच्या रास्त मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेवटी आम्हाला प्रखर आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा 25 जून रोजी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन व त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 30 जूनपासून बेमुदत संप करण्यात येईल, असा इशाराही संघटनेचे अध्यक्ष बी. एम. कांबळे यांनी दिला आहे.
- सहाव्या वेतन आयोगात औषधनिर्माण अधिकारी संवर्गास केंद्र शासनाच्या नियमानुसार पूर्वलक्षी प्रभावाने वेतनश्रेणी लागू करावी.
- सेवाकाळात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे कुंठीतता घालवण्यासाठी पदोन्नतीच्या सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
- औषधनिर्माण अधिकारी यांचे ई. आर. 19 या नुसार सेवा नियम अद्ययावत करण्यात यावेत.
- उच्च् शिक्षणासाठी सेवेत कार्यरत असताना केंद्र शासनाने मान्यता प्रदान केलेला ब्रीज कोर्स लागू करावा.
- ‘एनआरएचएम’अंतर्गत कंत्राटी सेवेवर घेण्यात येणारे औषधनिर्माण अधिकारी यांना अनुभवाच्या आधारे नियमित पदावर नियुक्त ीमध्ये सरसकट प्राधान्य द्यावे.
- कंत्राटी सेवकांना मासिक रुपये 7000 हजार ऐवजी 20 हजार रुपये द्यावे.
- फार्मसी अ‍ॅक्ट 1948 कलम 42 चे होत असलेले उल्लंघन टाळण्यासाठी 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातील औषधनिर्माण अधिकारी पदांची पुनर्निर्मिती पूर्ववत दोन पदे कायम करावी.
- महाराष्ट्र सिव्हिल मेडिकल कोड प्रकरणानुसार आरोग्य केंद्रस्तरावर औषधनिर्माण एकूण पदाच्या 10 टक्के रजा पदाऐवजी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन पदे निर्माण करावीत.