आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मितांचा सोलापूरशी स्नेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती व सिनेसृष्टीच्या प्रेमळ स्मिता तळवलकर यांच्या जाण्याने मालिका विश्वावर आणि मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. मात्र, या अभिनेत्रीचे सोलापूरशी घट्ट नाते होते.

जनता बँकेचे व्याख्यान, विविध कार्यक्रम आणि खास चौकट राजा या चित्रपटाच्या प्रीमिअर शोसाठी त्या चौकट राजा चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह हुतात्मा व प्रभात चित्रपटगृहात आल्या होत्या. या वेळी त्यांनी सोलापूरच्या रसिकांनी नेहमीच आपल्या चित्रपटांची वाहवा केली.

गेल्या तीन वर्षांपूर्वी त्या सुशील क रंडक एकांकिका स्पर्धेसाठी आणि सोलापुरात झालेल्या नाट्यसंमेलनाला आल्या होत्या, अशा आठवणी स्मिता तळवलकर यांच्याशी जोडलेल्या होत्या.

लायन्सचा जीवन गौरव पुरस्कार
नरेंद्र कुंभार यांच्या काळात त्यांनी स्मिता तळवलकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वासाठी लायन्स जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला होता. त्यांच्या या कार्यक्रमात त्यांनी आपल्या कार्यकाळातील मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या.

शेंगापोळी आणि चटणीची आवड
सोलापूरच्या चटणीची आणि गोड शेंगापोळीची स्मिता तळवलकर यांना गोडी होती, अशी माहिती येथील विठ्ठल बडगंची यांनी दिली.