आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतिवनात 27 नक्षत्र, 12 राशींच्या वनस्पतींची बाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आपली रास अधिक फलदायी करण्यासाठी वेगवेगळय़ा पर्यायांच्या शोधात असाल आणि त्यात मोठय़ा प्रमाणावर पैसे खर्च होणार असतील तर जरा थांबा. सामाजिक वनीकरण विभागाने एक चांगला पर्याय शोधला आहे, राशीप्रमाणे फलदायी वृक्षसंवर्धन.

पंचांगात प्रत्येक रास आणि नक्षत्रासाठी आराध्य वृक्ष सांगितलेला आहे. मुख्य वृक्ष उपलब्ध नसल्यास पर्यायी वृक्ष आहे. सूर्य, नवग्रह व नक्षत्रे याचा माणसांवर परिणाम होत असल्याचा दावा भविष्यकारांनी केला आहे. परिणाम सुसह्य करण्यासाठी विधीही सांगण्यात आले आहेत. वृक्षांचे जतन करून माणूस आपले भाग्य उजळवतो, असेही सांगितलेले आहे. नेमका हाच धागा धरून सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षसंवर्धनाचा हेतू साध्य करण्याचे ठरवले आहे.

विजापूर रस्त्यावरील स्मृतिवनात सामाजिक वनीकरण विभागामार्फत 27 नक्षत्र, 12 राशींचे हर्बल गार्डन उभारत आहे. शहर व परिसरातील हे पहिलेच उद्यान असून खुडूस (ता. माळशिरस) येथे वनविभागातर्फे चार वर्षांपूर्वी नक्षत्र वन तयार केले आहे. जागतिक वन दिनी (21 मार्च) त्याचे उद्घाटन होणार आहे.


गोलाकार उद्यानात 12 राशींसाठी स्वतंत्र वाफे तयार करण्यात आलेत. त्यामध्ये बारा राशींचे आराध्य वृक्ष लावण्यात येतील. तसेच, 27 नक्षत्रांची रोपं त्यामध्ये लावण्यात येणार आहेत. सर्व राशी व नक्षत्रांचे आराध्य वृक्षांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. नक्षत्र उद्यानच्या मध्यभागी कमळ टँक तयार केले आहे. त्यामध्ये पाच रंगांतील कमळं लावण्यात येतील. उद्यानाच्या मध्यभागी औषधी वनस्पतीची माहिती दर्शवणारे फलक लावण्यात येणार असून त्याभोवती विविध फूलझाडे लावण्यात येतील.

वनस्पतीशास्त्रच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
नक्षत्र उद्यानात लावण्यात येणारी रोपं औषधी गुणधर्माची आहेत. त्याचे वैशिष्ट्ये, महत्त्व याबाबतचा अभ्यास वनस्पतीशास्त्र व आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

उद्यानसाठी झटतात वनमजूर
सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेल्या नक्षत्र वनासाठी वनमजूर शीतल बडबडे, मधुकर आयवळे, शंकर चव्हाण, टी.जी.घंटे, बाबूलाल शेख प्रयत्नील आहेत.

राशींचे उपासना वृक्ष
रास फलदायी वृक्ष उपवृक्ष
मेष अडुळसा कुचला, आवळा, खैर
वृषभ बेहडा उंबर, जांभूळ, पिंपळ
मिथुन चंदन कृष्णसागरू, वड, वेळू
कर्क नागचाफा पळस, उंडल, पिंपळ
सिंह पळस बेल, वड, रिठा
कन्या बकुळ पायरी, जाई
तूळ पारिजातक सावर, अर्जुन
वृश्चिक अशोक नागकेशर
धनू वेत देवबाभूळ
मकर कांचन फणस, आंबा
कुंभ आपटा नीम, हिरडा, शमी
मीन आवळा लिंब, मोहा