आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Institutions, Latest News In Divya Marathi

मंत्रालयासमोर आंदोलनासाठी दोन हजार कोळी बांधव रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्ह्यातील कोळी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून महादेव कोळी हा दाखला दिला जात नाही. हा दाखला मिळण्यासाठी धाडस सामाजिक संस्थेचे संस्थापक शरद कोळी यांच्या नेतृत्वाखाली 2 हजार तरुण मुंबईकडे रवाना झाले. बुधवारी सकाळी 11 वाजता मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. मंगळवारी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी व डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. वारंवार मागणी करूनही शासन महादेव कोळी समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचे शरद कोळी यांनी सांगितले. महादेव कोळी दाखला मिळत नसल्याने अनेकांना नोकरीवर पाणी सोडावे लागत आहे तर अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही शिक्षण घेता नाही. शिवाय महादेव कोळी प्रवर्गातून सध्या नोकरीवर आहेत, त्यांचाही जीव टांगणीला आहे, अशी व्यथा कोळी यांनी मांडली. जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कोळी, रवी घंटे, आप्पाशा कोळी उपस्थित होते.