आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजकल्याणचा ९० टक्के निधी अखर्चित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी सेस फंडातून दिलेल्या सहा कोटी ८५ लाख निधीपैकी तब्बल कोटी ९० लाखांचा निधी अखर्चित आहे. ३१ मार्चपर्यंत तो निधी खर्च करण्याचे आव्हान असताना यंदाच्या वर्षासाठी पुन्हा दीडपट वाढीव निधीचा प्रस्ताव समाजकल्याण समितीच्या बैठकीत करण्यात आला. मिळालेल्या निधी खर्चाचा पत्ता नाही अन् कागदोपत्री नियोजनाच्या फाइली करण्याचा सपाटा झेडपीत सुरू असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची बैठक मंगळवारी सभापती कल्पना निकंबे यांच्या अध्यक्षतेखाली शिवरत्न सभागृहात झाली. त्यामध्ये सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी समितीच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. गेल्या वर्षी (सन २०१४-१५) मध्ये समाज कल्याण विभागाला सहा कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. पण, जानेवारी महिना संपत आला तरी तब्बल पाच कोटी ८९ लाख रुपयांचा निधी अखर्चित आहे.

रत्नाई घरकुल, महिलांना शिलाई मशीन पुरवणे, तीन पाच एचपीच्या विद्युत मोटारी, संगणक, पल्वलायझर मशीन, कडबा कुट्टी मशीन, जिम साहित्य, शेतकऱ्यांसाठी कॅरेट, गॅस संच, पीव्हीसी पाइप संच, दुर्धर रोगांसाठी औषधे, स्प्रिंकलर संच, अपंगांना पल्वलायझर संगणक, संसार उपयोगी भांडी खरेदी तरतूद केली आहे. पण, त्यावर एक रुपयाचाही खर्च झालेला नाही.