आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Effect, Pune Issue, One More Critical At Solapur

सोशल मीडियाचे पडसाद : दगडफेकीत जखमी झालेले सांगोल्याचे रुपनर अत्यवस्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोशल मीडियावर महापुरुषांचे अवमान प्रकरणा पुण्यात राहणार्‍या मूळच्या सोलापूरच्या मोहसीन शेखचा बळी गेला. त्याचबरोबर या प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनात सोलापूरच्या (सांगोला) वसंत रुपनर याच्या कुटुंबावरही अवकळा आली आहे. पुण्यात या प्रकरणानंतर झालेल्या दगड़फेकीमध्ये रुपनर गंभीर जखमी झाले आहेत.
वसंत व त्यांचा भाऊ मुंबईत ट्रकवर चालक आहेत. पत्नी सखूबाई या गावात राहतात. सुशील नावाचा मुलगा अस्थिव्यंग असून, तो सांगोल्यातील मूकबधिर शाळेत शिकतोय. राहुल नावाचा मुलगा सहावीत आचकदाणी गावात शिकतोय. वसंत हे आठवडा-पंधरवड्यातून गावी ये-जा करायचे. मुलांच्या शिक्षण साहित्य खरेदी आणि नातेवाइकाचे लग्न असल्यामुळे ते गावी येताना त्यांच्यावर ही दुर्दैवी घटना ओढावली. दरम्यान, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डी. डी. गायकवाड यांच्याशी संवाद साधला असता, वसंत यांच्यावर ट्रॉमा आयसीयू सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असून उपचाराला प्रतिसाद देत आहेत, असे त्यांनी सांगितले.
वसंत यांच्यावर कुटुंबाचा भार- वसंत यांच्यावरच कुंटुबाचा भार आहे. पत्नी, दोन मुले आहेत. शेती नाही. घरही घरकुल योजनेतून मिळाले. कामाला गेल्याशिवाय चूल पेटत नाही अशी स्थिती आहे. मुलांचे शिक्षण खर्च, पतीचे उपचार या आर्थिक विवंचनेत हा परिवार आहे. पत्नी सकुबाई यांच्याशी संवाद साधला असता, पुण्यातील उपचार झेपणार नसल्यामुळे सोलापुरात आणले आहे. तिथे दररोज तीस ते चाळीस हजार खर्च येत होता असे सांगताना त्यांचे डोळे भरून आले. सकुबाई यांचा भाऊ नारायण माने व अन्य नातेवाईक रुग्णालयात आहेत. तेही उपचारासाठी प्रयत्न करताहेत. मोठा खर्च आहे, आर्थिक उत्पन्न नाही. बहिणीवर हा प्रसंग आल्यामुळे मानेही दु:खात आहेत.
अत्यवस्थ अवस्थेत उपचार- पत्नी सखूबाई यांना खासगी बसचालकाने अपघातानंतर घटनेची माहिती दिली. त्यांनी पुण्यात धाव घेतली. जखमी वसंतवर ससूनमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर तिथेच शस्त्रक्रिया झाली. दररोज तीस ते चाळीस हजार रुपये खर्च होता. दरम्यान, पुण्यातीलच एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केल्यानंतर आर्थिक खर्च झेपत नसल्यामुळे 5 जून रोजी त्यांना सोलापुरात आणले. पत्नीने जमवलेले पैसेही संपले आहेत.
दानशूर व्यक्तींकडून मदतीची अपेक्षा- वसंत रूपनर यांच्या उपचारासाठी आर्थिक खर्च मोठा आहे. दानशूर व्यक्तींकडून मदत मिळाल्यास चांगले उपचार मिळू शकतील. रूपनर परिवाराला मोठा आधारही मिळेल.