आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया वापराबाबत तरुणाईत हवी सजगता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- फेसबुक, व्हॉट्सअप हे आजकाल परवलीचे शब्द झाले आहेत. स्मार्ट फोनच्या माध्यमातून तरुणाईच्या हातात हे नवे माध्यम सहज विसावले आहे. मात्र, या सोशल साइटचा वापर जसजसा वाढतो आहे, तसतसा त्याच्या गैरवापराची दुसरी बाजूही सामोर येत आहे. व्हॉटसअप हे मोबाइल अँप आहे. हे अँप्लिकेशन केवळ स्मार्ट फोनमध्येच आहे. मात्र, फेसबुक या सोशल साइटचे तसे नाही. कोणत्याही इंटरनेटयुक्त संगणकात, मोबाइलमध्ये ते सहजी इन्टॉल असते.
फेसबुकवर एखादे आक्षेपार्ह छायाचित्र कोणी टाकले तर ज्या संगणकावरून अपलोड केले गेले त्या संगणकाचा आयपी अँड्रेस तपासयंत्रणेला सापडू शकतो. त्यावरून चुकीची माहिती, अफवा पसरवणारा सहज जाळ्यात सापडू शकतो. पण यातील दुसरी बाजू अशीही आहे की प्राक्झी सर्व्हर वापरूनही विघातक कृत्यांचे सर्मथन, आक्षेपार्ह छायाचित्रे अपलोड होऊ शकतात. त्यामुळे त्यावर आळा घालणे अधिकच जटिल बनते आहे.