आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, Her Courage Save Her Child, Divya Marathi

आईच्या धाडसामुळे वाचले मुलाचे प्राण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातील वस्तीच्या बाजूलाच विहीर..तीनही मुलांना खेळताना पाहून ती जनावरांना चारापाणी करू लागली..तेवढय़ात दीड वर्षाचा धनुष्य खेळत असताना विहिरीत पडला.. पाहते तर काय मुलाचा पत्ता नाही.. तिने तडक विहिरीकडे धाव घेतली..भरलेल्या विहिरीत मुलगा बुडत होता.. क्षणाचाही विलंब न लावता तिने विहिरीत उडी घेऊन त्याला बाहेर काढले आणि तडक दवाखाना गाठला.. आईचे धाडस व प्रसंगावधान यामुळे धनुष्य मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला. पोटी वाढवलेल्या बाळाचा पुनर्जन्म झाल्याच्या आनंदाने आई कल्पना बेळ्ळेंचा चेहरा आनंदाने खुलला. येळगी (ता. इंडी, जि. विजापूर) येथील ही घटना.

4मला पोहता येत असल्याने हे धाडस केले. वेळेत केलेल्या उपचारामुळे माझा मुलगा वाचला. तसेच बाळाला जन्म दिल्यानंतर आईला आनंद होतो. परंतु मी माझ्या मुलाला मृत्यूच्या दारातून परत आणले, याचे मला समाधान वाटते.’’ कल्पना बेळ्ळे, मुलाची आई
4वेळेत उपचाराला आणले. बाळाच्या पोटातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, तातडीने केलेल्या उपचारामुळे बालकाला वाचवता आले.’’ डॉ. चिंतामणी चौधरी, तेरामैल