आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, In Science Era Treadle Machine Using For Print, Divya Marathi

विज्ञानाच्या युगातही छपाईसाठी अद्याप केला जातो ट्रेडल मशिनचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक मुद्रण दिन विशेष

काही वर्षांपूर्वी लग्नपत्रिका, बारसे, सार्वजनिक कार्यक्रम, दुकानाची बिलबुके आदी छपाईची कामे मुद्रणालयात केली जायची. काळानुरूप छापण्याच्या विविध कला आणि प्रकार उदयास आले; पण आजही महत्त्वाची आकडेवारी, पंचिंग आणि ब्लॉक प्रिंटिंगची कामे याच जुन्या ट्रेडल मशिनवर केली जातात, हे वैशिष्ट्य.

काय आहे ट्रेडल?
ट्रेडल मशिन म्हणजे मोठाले चाक, रुळ, गोल धातूची चकती यांची छपाईची पारंपरिक मशिन. डीटीपी, ऑफसेट आणि स्क्रिन प्रिटिंग असे प्रकार अस्तित्वातही नसताना अक्षरे, काना, मात्रा, वेलांटी, उकार यांचे शिस्याचे खिळे एकत्र जोडून एक ब्लॉक केला जायचा. नंतर तो एका साच्यात बसवून छपाईच्या शाईने तो मजकूर या मशिनद्वारे कागदावर उतरवून काम व्हायचे.
संख्या कमी; पण काम तेवढेच
शहरात अशा मुद्रणालयांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असली तरी प्रत्येकाला पुरेसे काम आहे. आजही शाळा महाविद्यालयांसाठी लागणार्‍या उत्तरपत्रिका, रास्त भाव धान्य दुकानांची बिलबुके, पावतीपुस्तके आदींची कामे याच मशिनवर केली जातात.
कल्पकतेचे काम
4सध्यास बहुतांश कामे संगणकाद्वारे केली जातात. हवे ते इंटरनेटवर मिळते. परंतु पूर्वीचे काम नावीन्यतेने भरलेले असायचे. स्वातंत्र्यपूर्व काळात या मशिनवरच निघणार्‍या पत्रकांचा इंग्रजांनी धसका घेतला होता.’’ अरुण मेणसे, साईनाथ मुद्रणालय
विजेशिवायही छपाई शक्य
जुन्या ब्रिटिशकालीन मशिनरीमध्ये एक अद्ययावत सुविधा आहे. आजही त्याचा वापर होतो. एरवी विजेवर चालणारे हे मशिन वीज गेल्यावर शिलाई मशिनच्या पायाजवळ असणार्‍या पायडलप्रमाणे यालाही पायाने चालवायचे पायडल आहे. त्याद्वारेही ताशी हजार प्रती छापता येण्याची यात सुविधा आहे.
छपाईपूवी खिळे जुळवताना कर्मचारी. दुसर्‍या छायाचित्रात वीज गेल्यावर चालणारी ट्रेडल मशिन
ट्रेडल कामात टिकाऊपणा
4आताची छपाई आणि ट्रेडलद्वारे केलेली छपाई यात जमीन-आसमानचा फरक आहे.ट्रेडलच्या छपाईत टिकाऊपणा आहे. हा व्यवसाय बंद पडेल. पण, असे कधी घडलेले नाही. काम करणार्‍या या क्षेत्रात अद्यापही भरपूर कामे मिळतात, हे खरे आहे. ’’ रमेश कोंगारी, महाराष्ट्र मुद्रणालय
विज्ञानाने बरीच प्रगती केली तरीसुद्धा आजही छपाईच्या कामासाठी ब्रिटिशकालीन ट्रेडल मशिनचा बर्‍याच ऑफसेट मुद्रणालयात वापर होतो. शिवाय याने केलेली छपाई चिरकाल टिकणारी असते, असा विश्वास शहरातील मुद्रणालयांच्या मालकांनी व्यक्त केला.