आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईटीत वालचंदच्या सोहम गांधी प्रथम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सामान्य प्रवेश चाचणीच्या (सीइटी) निकालात वालचंद शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी सोहम अतुल गांधी याने 200 पैकी 188 गुण पटकावून उज्ज्वल यश मिळवले. ए.डी. जोशी ज्युनिअर कॉलेजच्या ऋषिकेश कुलकर्णी या विद्यार्थ्याने गणितात 100 पैकी 100 गुण मिळवण्याचा विक्रम केला. तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमासाठी मे 13 मध्ये प्रवेश परीक्षा घेतली. सोलापुरातून नऊ हजार 937 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. याचा ऑनलाइन निकाल बुधवारी घोषित झाला. संगमेश्वर महाविद्यालयातील पियुष महेश कुलकर्णी ही 175 गुणांसह महाविद्यालयात प्रथम, तर ऋषभ सतीश ढगे 170 गुणांसह द्वितीय आले. पियुषला मेकॅनिकल अभियांत्रिकीत करिअर करावयाचे आहे. मेकॅनिकल किंवा सिव्हिल अभियांत्रिकीत करिअर करायला आवडेल, असे ऋषभने सांगितले.

ए. डी. जोशी महाविद्यालयातील 300 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते. त्यातील 10 विद्यार्थ्यांनी 170 पेक्षा जास्त गुण पटकावले आहेत. यात अजिंक्य झळकीकर (183 प्रथम), शुभम तोष्णिवाल (181 द्वितीय), मयूर जाधव (177 तृतीय), ऋषिकेश कुलकर्णी (174), वैष्णवी कोल्हापुरे (172), रौनक माने (172), र्शीनिवास काकडे (171), रणजित पाटील ( 170) यांनी यश मिळविले. संस्थेचे अध्यक्ष ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी, सायली जोशी, प्राचार्य प्रवीण देशपांडे यांनी यशस्वितांचे अभिनंदन केले.


वालचंदच्या सोहम गांधीला सीइटीत 188 गुण
वालचंद महाविद्यालयाच्या सोहम गांधीने 188 गुण पटकावल्याचा आनंद वडील अतुल गांधी यांच्यासमवेत द्विगुणीत केला. स्कॉलर अकॅडमीचा तो विद्यार्थी. प्रा. अमोल कुलकर्णी, प्रा. कारंडे यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय प्रा. जगपात, प्रा. कस्तुरे यांचेही मार्गदर्शन त्याला लाभले असे त्याने सांगितले. रोज चार ते पाच तासांचा अभ्यास तो करत असे. मात्र, अकरावीत प्रवेश घेतल्यापासून म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून अभ्यासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे सोहम म्हणतो. सोहमला बारावीत 92.83 टक्के मिळाले आहेत. जेइइ मेन परीक्षेतही त्यास 187 गुण मिळाले आहेत.