आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सोहम’ची फाइल अडकली नगररचना कार्यालयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विजापूर रोडवरील सैफुल चौकात बांधलेल्या सोहम प्लाझाचा बांधकाम परवाना महापालिकेने रद्द केला. त्यानंतर झालेल्या मोजणीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाकडून महापालिकेस पत्र आल्याने त्यावर अभिप्राय घेण्यासाठीची फाइल नगररचना कार्यालयात आहे. ती फाइल तेथे महिन्यापासून अडकून पडली आहे. त्यामुळे नगररचना कार्यालयाकडे संशयाची सुई बळावत चालली आहे.

सोहम प्लाझाचे बांधकाम फ्रंट मार्जिनमध्ये पाच मीटर पुढे आल्याने त्यांचा बांधकाम परवाना महापालिकेने रद्द केला आहे. त्यानंतर विजयालक्ष्मी डेव्हलपरचे संजय शेळके यांनी शासनाकडे दाद मागितली. शासनाने मनपाकडून अहवाल मागवला आणि दोन आठवड्यांची स्थगिती दिली. त्याची मुदत आता संपली आहे. बांधकाम 34 मीटरवर ठेवण्याची सहमती राष्ट्रीय महामार्गाने महापालिकेस दिली. अभिप्रायासाठी फाइल महिन्यापूर्वी नगररचना कार्यालयाकडे पाठविल्याची माहिती, अभियंता इर्शाद जरतार यांनी दिली.

नगररचना कार्यालयाचे झेड. ए. नाईकवाडी यांनी त्या फाइलला पंधरा दिवस हातही लावला नाही. दरम्यान, नाईकवाडी यांची उचलबांगडी झोन कार्यालयाकडे करण्यात आली. त्यानंतर महेश क्षीरसागर यांच्याकडे पदभार देण्यात आला.