आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान खात्याचा तुटला आहे जगाशी ‘संपर्क’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अतिवृष्टी, पूर किंवा ढगफुटी असे काहीही नसताना सोलापुरातील हवामान खात्याच्या कार्यालयाचा जगाशी संपर्क तुटला आहे. गेल्या चार दिवसांपासून इंटरनेट आणि टेलिफोन यंत्रणा बंद आहे. त्यामुळे पाऊस आणि तापमानाची आकडेवारी मिळणे कठीण झाले आहे.

शहराच्या पूर्व भागातील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हवामान खात्याचे कार्यालय आहे. हवामान खात्याने टेलिफोन बंद झाल्याची तक्रार नोंदवूनही भारत दूरसंचार मंडळाच्या (बीएसएनएल) अधिकारी-कर्मचार्‍यांनी तातडीने दुरुस्ती केलेली नाही. हवामान खात्याचे महत्त्व लक्षात आले नसल्यानेच बीएसएनएलच्या अधिकार्‍यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. पाऊसपाण्याचे दिवस आहेत. हवामानाचा अंदाज किंवा अन्य माहिती लोकांना मिळणे महत्त्वाचे असते. विशेष म्हणजे या दोन्ही संस्था सरकारी असूनही दुरुस्तीचे काम तत्परतेने झालेले नाही.

केबल तुटली
बीएसएनएलची केबल तुटल्याने 19 जूनपासून इंटरनेट व फोन बंद आहे. वारंवार तक्रार (तक्रार क्रमांक : 1012220528) केली आहे. मात्र, कर्मचारी दुरुस्तीसाठी आला नाही.’’ एस. के. बिराजदार, विभागप्रमुख, सोलापूर हवामान विभाग