आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या इंजिनला येतोय स्पीड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन सोलापुरात स्पीड घेत असल्याचे वातावरण आहे. निवडणुकीसाठीच्या इच्छुकांनी मंगळवारी राज ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली आहे. विशेष म्हणजे ताज ग्रुपचे तौफिक हत्तुरे या शिष्टमंडळात सहभागी होते.

मागील आठवड्यात मनसेच्या नेत्यांनी सोलापुरात आढावा बैठक घेतली होती. या वेळी इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीचा दावा करण्याची संधी घेतली. मुंबईत ‘कृष्णकुंज’ येथे मंगळवारी गेलेल्या शिष्टमंडळात दिलीप धोत्रे (पंढरपूर), युवराज चुंबळकर (दक्षिण सोलापूर), तौफिक हत्तुरे (शहर मध्य) हे सहभागी होते.

हत्तुरे यांच्या पक्ष प्रवेशाचे दिलीप धोत्रे यांनी स्वागत केले. शहर उत्तरमधून विद्यमान जिल्हाध्यक्ष भूषण महिंद्रकर, शहराध्यक्ष प्रशांत इंगळे हे दोघेही इच्छुक असले तरी पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

मुंबईत भेटीला
मनसेचे जिल्ह्याचे संपर्क अध्यक्ष दरेकर यांच्यासमवेत राज ठाकरे यांची भेट घेत आहे. बुधवारी अधिकृत घोषणा पक्षाचे श्रेष्ठी करतील.’’ तौफिक हत्तुरे, ताज सोशल ग्रुप