आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर-मुंबई साप्ताहिक रेल्वेगाडीसाठी हालचाली, अर्थसंकल्पासाठी पाठवला प्रस्ताव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लवकरच सादर होणार्‍या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पासाठी सोलापूर विभागाने पाठवलेल्या गाड्यांच्या प्रस्तावातील सोलापूर-मुंबई (कुर्ला) या रेल्वेगाडीस मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मिळत आहेत. ही गाडी सुरू झाल्यानंतर ती दररोज धावेल यासाठी सोलापूर विभाग प्रयत्न करेल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी सुशील गायकवाड यांनी दिली.

अशी धावेल गाडी : सोलापूर-कुर्ला ही गाडी सुरुवातीला आठवड्यातून एकदा धावेल. दर सोमवारी ही गाडी कुर्ला येथून दुपारी 1.20 वाजता सोलापूरकडे धावेल. कल्याण, पुणे, दौंड, कुडरुवाडी आदी स्थानकांवर थांबा घेऊन सोलापूरला रात्री 11.15 वाजता पोहोचेल. सोलापूरला आल्यानंतर ही गाडी 21 तास सोलापूर रेल्वे विभागाकडे असेल. त्यानंतर मंगळवारी रात्री 8.50 वाजता सोलापूरहून निघून बुधवारी सकाळी 7.35 वाजता कुल्र्याला पोहोचेल. ही गाडी 22 डब्यांची असणार आहे. यामुळे सोलापूरकरांची गैरसोय दूर होणार असली तरीही गाडीची वेळ ही ऑड आहे. शिवाय या गाडीस सोलापूरला पोहोचण्यास अन्य गाड्यांपेक्षा थोडा अधिक वेळ लागणार आहे.

एकवीस तासांच्या हॉल्टमध्ये पुणे वारी
गाडी मुंबईहून सोलापूरला आल्यानंतर 21 तासांचा सोलापूर हॉल्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन या अवधीत सोलापूर-पुणे ही नवीन गाडी सुरू करण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास सोलापूरकरांच्या दृष्टीने ही गाडी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.