आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर - पुणे हिवाळी सुपरफास्ट एक्स्प्रेसला मध्य रेल्वेचा हिरवा झेंडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - हिवाळा हंगामात सोलापूर विभागाने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या ‘सोलापूर-पुणे हिवाळी सुपरफास्ट’ या साप्ताहिक गाडीला आणखी काही दिवस हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता आहे. ती दररोज धावण्यासाठी सोलापूर विभाग प्रयत्न करत आहे.

नोव्हेंबर 2012 मध्ये दर रविवारी ती सुरू झाली होती. दोन महिन्यात तिच्या 12 खेपा झाल्या. सुमारे 15 हजार प्रवाशांनी प्रवास केला. प्रतिसादामुळे गाडीला तीनदा मुदतवाढ मिळाली. रेल्वे प्रशासनाने सोलापूर-यशवंतपूर गाडीचा रेक वापरण्यात येतो. रविवारी ही गाडी सोलापूर यार्डात असते. मंजुरीनंतर ती कायमस्वरूपासाठी दर रविवारी सोलापूर -पूणे -सोलापूर अशी धावेल. सुरुवातीला आठवड्यातून एकदा, नंतर तीनदा मग ती रोजच धावेल. त्यासाठी सोलापूर विभाग प्रयत्न करणार आहे.

सोलापूरहून : 11 वाजून 10 मिनिटांनी सुटते. कुडरुवाडी, दौंड आदी थांबे घेत
पुणे : दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी पोहोचते.
पुणे : दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी निघेल
सोलापूरहून : रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी पोहोचणार आहे

कायमस्वरूपी मंजुरीची शक्यता
हिवाळी सुपरफास्ट एक्स्प्रेसला सोलापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात या गाडीस कायमस्वरूपासाठी मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार असली तरीही ती रोज धावावी म्हणून सोलापूर रेल्वे विभाग प्रयत्न करणार आहे.’’ सुशील गायकवाड, जनसंपर्क अधिकारी