आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरचे 17 जण बद्रिनाथमध्ये सुखरूप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उत्तराखंडमध्ये गेलेले जिल्ह्यातील 17 जण अद्याप बद्रिनाथमध्ये अडकले आहेत. तेथे गेलेल्या विशेष नियंत्रण पथकाचा त्यांच्याशी संपर्क झाला असून ते सर्वजण सुखरूप आहेत. त्यांच्यापर्यंत सुटकेसाठी मदत यंत्रणा पोचलेली नाही. जिल्ह्यातील 170 जण अडकले होते. त्यापैकी 149 परतीच्या प्रवासात असून, काहीजण पोहोचले आहेत.

बद्रिनाथमध्ये 17 पर्यटक असून त्यामध्ये मोहोळच्या जयर्शी क्षीरसागर, योगिता क्षीरसागर, बार्शी येथील प्रसाद कुलकर्णी, अभिजित पाटील, राजेश शहापुरे, तानाजी कोल्हे, विनोद पवार व सोलापुरातील सिंघम कुटंबातील 10 जणांचा समावेश आहे. ते सुखरूप असून त्यांच्या आरोग्याची काळजी व जेवणाची सोय केली असल्याचे पथकातील उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितले. पुणे विभागातील 561 पर्यटक अडकले आहेत.