आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या कलाकारांचा ओरिसामध्ये ‘जलवा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- स्वाती रत्न शिक्षण क्रीडा समाजसेवा महिला संस्थेच्या कलावंतांनी ओरिसा येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. नीतेश फुलारी याने जोगवा चित्रपटातील ‘लल्लाटी भंडार’ या गीतावरील नृत्यासाठी तर अमोल गवळी याने रोबोटच्या वेस्टर्न फ्यूजनवरील नृत्यासाठी प्रथम क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात श्रध्दा गंदगे व श्रध्दा मनसावाले यांनी इंडियन फ्यूजन सादर केले. त्यांना बेस्ट अँवॉर्डने गौरवण्यात आले.

उत्कल युवा सांस्कृतिक संघातर्फे कटक शहरात 9 जानेवारी रोजी नृत्य व संगीत महोत्सव झाला. त्यात सोलापूरच्या कलाकारांनी यश मिळवले. राज्याचे प्रतिनिधित्व करत महिला संस्थेच्या कलावंतांनी ओरिसा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पध्रेत भारतीय संगीत व वेस्टर्न या दोन्हींचा मेळ घालून नृत्याचा उत्तुंग व अनोखा आविष्कार सादर केला. नीतेश फुलारी, अमोल गवळी, श्रध्दा गंदगे, श्रध्दा मनसावाले या क लावंतांना येत्या मे महिन्यात परदेशात कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

कष्टाचे फळ मिळाले
मुलांनी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी खूप मेहनत केली होती. त्या मेहनतीचे रूप त्यांना विजयात पाहायला मिळाले आहे.
-स्वाती मनसावाले, नृत्य दिग्दर्शिका

आम्हाला ही संधी मिळाली याचा आनंद मोठा आहे. ओरिसात गेल्यानंतर तेथे शिकायला मिळाले. यशाचे र्शेय सोलापूरकरांचे आहे.
-श्रद्धा मनसावाले, कलाकार

मी पहिल्यांदाच अशा मोठय़ा स्पध्रेत सहभागी झाले. अशा स्पध्रेत आपण विजयी व्हावे, ही कल्पनाच कधी केली नव्हती. ती सत्यात उतरल्याने आनंद झाला आहे.
-श्रद्धा गंदगे, कलाकार