आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Advocate Fast For Mumbai High Court Bench

उच्च न्यायालय खंडपीठासाठी सोलापुरात वकिलांचे चक्रीउपोषण सुरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरात व्हावे, या मागणीसाठी सोलापूर बारने आंदोलनाची व्यापकता वाढवण्यासाठी सोमवारी चक्रीउपोषण केले. मंगळवारी (दि. 24) सर्वपक्षीय संघटना, व्यापारी, विद्यार्थ्यांचा मोर्चा सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाणार आहे.

चक्रीउपोषणस्थळी आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार आडम मास्तर, नगरसिंग मेंगजी, माजी महापौर र्जनादन कारमपुरी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, सभागृह नेते महेश कोठे, शिवाजी पिसे, नगरसेवक चेतन नरोटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले, प्रकाश वानकर, नगरसेवक मनोहर सपाटे यांच्यासह व्यापारी, शासकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी भेट दिली. या वेळी बारचे अध्यक्ष शिवशंकर घोडके यांच्यासह वकील मंडळी उपस्थित होती.