आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Airport Closed For Runway Development Work

धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी विमानतळ बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - होटगी रस्त्यावरील सोलापूर विमानतळ दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता विमान किंवा हेलिकॉप्टरला येथे उतरता येणार नाही. धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याला दोन महिने लागतील, असा अंदाज आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून विमानतळाचा विकास करण्यात येत आहे.

अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. पैकी धावपट्टीची दुरुस्ती करून येथे रात्री उतरण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या काम सुरू झाले आहे. तूर्त सर्व वाहतूक थांबवण्यात आली आहे. यात प्रशिक्षण वैमानिक, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे विमान आणि हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. दुरुस्तीसाठी चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तो निधीही विमानतळ प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे.

दोन महिने बंद
धावपट्टीची दुरुती सुरू झाली आहे. हे काम दोन महिने चालेल. निधी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे.’’ संतोष कौलगी, विमानतळ व्यवस्थापक. भारतीय विमानतळ प्राधिकरण