आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमण्‍ध्‍य लवकरच पुन्हा विमानसेवा सुरू होण्याचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- होटगी रोडवरील विमानतळावर विमानसेवा सुरू होण्यासाठी आवश्यक असणार्‍या सुविधा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून एक एक करून देण्यात येत आहेत. यासाठी आतापर्यंत जवळपास 5 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. धावपट्टीचे नूतनीकरण, एअर ट्रॅफिक कंट्रोल, नाइट लॅंडिगची व्यवस्था, पापी लाइटस् आदी प्रमुख सुविधा पुरवल्यानंतर आता लवकरच फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटर बसवण्यात येणार आहे. विमानतळावर बसवण्यात येत असलेल्या सुविधा आणि तीन चार महिन्यांवर येऊन ठेपलेली लोकसभेची निवडणूक पाहता लवकरच विमानसेवा सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांनी विमानसेवेचे उद्घाटन केले होते. निवडणुका संपल्यानंतर काही महिन्यांनी विमानसेवा बंद झाली, हे उल्लेखनीय.

विमानतळावर विमानांना संदेश देणारी नॉन डिरेक्शन बीकन ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या ट्रान्समीटरच्या माध्यमातून टेक ऑफ व लॅन्डींगचे संदेश देणे शक्य होणार आहे. यासाठी सोलापूर विमानतळास लवकरच ट्रान्समीटरचा कोड मिळणार आहे. दिल्लीहून ही मशीन आणली जाईल. जवळपास 25 लाखांची ही मशीन आहे. तसेच विमानांना संदेश देण्यासाठी बसवण्यात येणार यंत्रणा, भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली मंजुरी

स्कॅनर मशीनही बसवले जाणार
यापूर्वी सोलापूर विमानतळावर वैमानिकांना फोनद्वारे संदेश देण्यासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल आणण्यात आले. आता बसवण्यात येणारी मशीन ही अत्याधुनिक असणार आहे. सिग्नलिंगसाठी महत्त्वाचे असणारे हे यंत्र बसवल्यानंतर स्कॅनर मशिनही बसवण्यात येणार आहे. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाणारे लगेज स्कॅनरदेखील लवकरच बसवण्यात येईल.

विमानांच्या सिग्नलींगसाठी आवश्यक असणारी नॉन डिरेक्शन विकम ही यंत्रणा सोलापूरसाठी मंजूर करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ती सोलापूरला पाठवून देण्यात येईल. राजीव मेहता, सह सरव्यवस्थापक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई विभाग