आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Airport Work Starts After The Land Report

भूमापन अहवाल मिळताच सोलापूर विमानतळाचे काम होणार सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - होटगी रस्त्यावरील सोलापूर विमानतळाच्या जमीन मोजणीचे काम झालेले आहे. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर विकासकामांना सुरुवात होईल, अशी माहिती विमानतळ व्यवस्थापक संतोष कौलगी यांनी ‘दिव्य मराठी’ला सोमवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जमीन मोजणी झाली. मात्र, अहवाल अद्याप आलेला नाही. अहवाल आल्यानंतर विमानतळाची जागा किती आहे व कोणत्या ठिकाणापर्यंत आहे. कुठे अतिक्रमण, नियमबाह्य बांधकाम झाले आहे यासह आदी बाबी उघड होणार आहेत. विमानतळ प्रशासन सध्या वाट पाहण्याच्या भूमिकेत आहे. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडून विमानतळाचे हस्तांतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे करण्यात आले आहे. ते सुरू करण्यासाठी काही मूलभूत विकासकामे करण्यात येत आहेत. विमानतळाची जागा महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात आहे. तर भारतीय विमानतळ प्राधिकरणकडे कामकाजाची जबाबदारी आहे.

अहवाल मिळताच पूर्वीच मंजुरी मिळालेल्या धावपट्टीची बांधणी, रात्री उतरण्याची सोय, वाहतूक नियंत्रण कक्षाची बांधणी, धावपट्टी दर्शवणारे दिवे (पापी लाइट्स), सामान तपासणी यंत्रणा आदी कामे होणार आहेत. यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी निधीही मंजूर झालेला आहे.