आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबा गणपतीस सुवर्ण किरीट; 41 तोळ्यांचा मुलामा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मानाचा आजोबा गणपतीच्या तांब्याच्या किरिटावर 41 तोळे सोने वापरून मुलामा चढवण्यात आला. भाविकांनी दिलेल्या देणगीच्या पैशातून हा किरीट बनवला गेला. गणेश जयंतीदिवशी (13 फेब्रुवारी) तो किरीट होटगी मठाधीपती योगीराजेंद्र शिवाचार्य यांच्या हस्ते र्शीस अर्पण करण्यात येणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस येथून मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष गौरीशंकर फुलारी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

चिदानंद वनारोटे, अनिल सावंत, कमलाकर करमाळकर, चंद्रशेखर कळमणकर, निर्मल हुल्ले, रामचंद्र रेळेकर, महोदव पाटील, अण्णाराव गवसने, सातलिंगप्पा दुधनी आदी उपस्थित होते. सोन्याचा मुलामा देण्याचे काम हैदराबाद येथे रामल्लू शिवचरण या कलाकाराने केले.