आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Anand Deshpande In New Upcoming Rama Madhav Movie

रमा माधव चित्रपटात सोलापूरचे देशपांडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्वामी कादंबरीवर आधारित बेतलेल्या आणि पेशवाई ची पार्श्वभूमी असलेल्या रमा माधव या ऐतिहासिक मराठी चित्रपटात सोलापूरचे इतिहास तज्ज्ञ अ‍ॅड. आनंद देशपांडे यांनी त्रिंबकराव पेठे ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या चित्रपटात इतिहास तज्ज्ञ देशपांडे यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला रमा माधव हा चित्रपट माधवराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांचे प्रेम आणि नातेसंबंधावर आधारित आहे. शिवाय या चित्रपटात तत्कालीन पेशवे काळ, शनिवार वाड्याचे वैभव, राजकीय पार्श्वभूमी दाखवण्यात आलेली आहे. अशा या ऐतिहासिक चित्रपटात अ‍ॅड. देशपांडे यांनी त्रिंबकराव पेठे साकाराला आहे.
त्रिंबकराव म्हणजे थोरल्या माधवरावांच्या काळात पेशवाई गाजवणारी वल्ली. माधवरावांच्या निधनानंतर बारभाई कारस्थानास पाठिंबा देत त्रिंबकराव यांनी सांगोल्याचा तह घडवून आणला होता. त्रिंबकरावांची शेवटची लढाई ही पंढरपूरच्या कासेगाव येथे झाली. या संपूर्ण प्रसंगात देशपांडे यांनी त्रिंबकरावांची भूमिका जिवंत केली आहे.

देशपांडे यांचे योगदान
देशपांडे अनेक वर्षे रूपेरी पडद्यावर काम करत आहेत. त्यांनी जाणता राजा या महानाट्यात मध्यवयीन शिवाजी राजे तर शाहिरांच्या भूमिका साकारल्या आहेत. या महानाट्याचे 275 प्रयोग झाले आहेत, तर लोकमान्य टिळकांच्या लोकमान्य या मालिकेत त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या सर्व भूमिकांचे भरभरून कौतुक झाले आहे.

भूमिकेने आनंद दिला
या चित्रपटात मला भूमिका मिळाली हे मी भाग्य मानतो. इतिहास हा माझा जीव की प्राण आहे. त्याचा आजवर अभ्यास करत आलो आहे. या चित्रपटातून खूप शिकायला मिळाले. तो काळ कसा होता हे लिहिण्या-वाचण्यापेक्षा तो प्रत्यक्ष अनुभवता आले. ते अनोखे होते. हा चित्रपट सोलापूरकरांनी आर्वजून पाहावा.’’ अ‍ॅड. आनंद देशपांडे, कलावंत