आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिक्षांना मीटरची सक्ती, असे असतील नवे दर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्य सरकारच्या आदेशानुसार येत्या 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात जुन्या व नवीन रिक्षांना इलेक्ट्रॉनिक अथवा डिजिटल मीटर बसवणे अनिवार्य आहे. रिक्षांना मीटर बसवण्याचा निर्णय यापूर्वी 1 मार्च 2012 रोजी घेतला होता, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. राज्य सरकारने आता पुन्हा एकदा मीटर सक्तीचा निर्णय घेतला. शहरात परमीट असलेल्या 8,257 रिक्षा आहेत. यातील केवळ 542 रिक्षांनाच मीटर बसवण्यात आले आहे. बसवण्यात आलेल्या मीटर्सपैकी बहुतेक बंद असल्याचा प्रवाशांना अनुभव येतो.

असे असतील दर
मीटर सुरू झाल्यापासून ते एक किलोमीटरपर्यंत रिक्षा दर 11 रुपये तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरला 10 रुपये ठरवण्यात आला आहे. अनेक प्रवासी भाडे जास्त होईल या भीतीने मीटरचा आग्रह करत नाहीत. परंतु यामुळे बहुतेक वेळा प्रवाशांचेच नुकसान होते.

निर्णय बैठकीनंतर
रिक्षाचालक, मालक राज्य कृती समितीने येत्या 15 व 16 एप्रिल रोजी मुंबई वगळता उर्वरित राज्यात रिक्षा बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात येत्या तीन ते चार दिवसांत रिक्षाचालकांची बैठक होणार आहे. त्या बैठकीतच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती लाल बावटा रिक्षा संघटनेचे सलीम मुल्ला यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

बंद असेल
रिक्षा मीटर बंद असेल तर आरटीओकडून कारवाई करण्यात येईल. मीटर नादुरुस्त असेल तर 300 रुपये दंड व किरकोळ बिघाड असेल तर 150 रुपयांची कारवाई होऊ शकेल.

तर परवाना नाही
राज्य सरकारच्या नियमांचे पालन करण्यात येईल. ज्या रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी आरटीओमध्ये येतात त्या रिक्षांना मीटर आहे की नाही हे पाहूनच परवाना देऊ. मीटर नसेल तर परवाना दिला जाणार नाही. ’’ अशोक पवार, साहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी