आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Become A Textile And Megasite City Issue

टेक्स्टाइल हब, मेगासिटी, पार्क उभारणीसाठी समिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यातल्या वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांची समिती नियुक्त करण्यात आली. त्यांनी नवीन टेक्स्टाइल पार्क, प्रोसेसिंग पार्क, स्पिनिंग पार्क, टेक्स्टाइल मेगासिटी, टेक्स्टाइल हब आदी स्थापन करण्याविषयी शिफारस करायची आहे. ३१ जानेवारी २०१५ पर्यंत त्यांचा अहवाल शासनाला जाईल. सोलापुरात भाजपचे दोन आमदार आहेत. त्यांनी यंत्रमागधारकांना घेऊन आग्रही मागणी मांडल्यास येथील वस्त्रोद्योगाला मोठी संधी मिळेल.

कापूस ते तयार वस्त्रनिर्मिती हे उद्दिष्ट समोर ठेवून वस्त्रोद्योग विकासाचा आराखडा तयार करण्याचे शासनाने ठरवले. त्यासाठीच ही समिती िनयुक्त केली. त्यात वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्व खातेप्रमुखांना सामावून घेतले. त्यामुळे अंमलात कुठल्याही विभागाची आडकाठी येणार नाही, असे शासनाला वाटते. वस्त्रोद्योग, उद्योग, ऊर्जा, कामगार, वित्त, सहकार आणि पर्यावरण या खात्यांचे प्रतिनिधी समिती सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

सोलापूरला ‘टेक्स्टाइल हब’ शक्य : हाळवणकर
सोलापुरात प्रामुख्याने चादर आणि टेरी टॉवेलचे उत्पादन होते. ही उत्पादने शंभर टक्के कॉटन आहेत. परंतु उत्पादन करणारी साधने आधुनिक नाहीत. त्यामुळे प्रथम यंत्रमागांचे आधुिनकीकरण करावे लागेल. केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्श्यातून ‘इंटिग्रेटेड टेक्स्टाइल पार्क’ची योजना आहे. त्यातून केंद्र ५० टक्के आणि राज्य २५ टक्के अशा ७५ टक्के अनुदानातून अत्याधुनिक यंत्रे घेता येतात. त्याचा लाभ िमळाल्यास यंत्रमागांचे आधुनिकीकरण होईल. त्यानंतर प्रोसेसिंग पार्क होईल. त्यांना सामूहिक सुविधा देणारी केंद्रे िनर्माण करता येतील. यालाच तर ‘टेक्स्टाइल हब’ म्हणतात. जे सोलापूरला शक्य आहे. याबाबत मंगळवारी (ता. १८) कोल्हापूरला एक बैठक आयोजित केली आहे. सोलापूरला लवकरच अशी एक बैठक होईल. यंत्रमागधारक संघाच्या कार्यालयातच ती आयोजित करण्याची सूचना केली. आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख यांनाही बोलावले आहे.