आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकलची समोरासमोर धडक; एक ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नवीन तुळजापूर नाक्याच्या अलीकडे मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यात एक ठार, तर तिघे जखमी आहेत. उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. पवन तानाजी रूपनर (वय 35, रा. सावरगाव, तुळजापूर) असे मृताचे नाव आहे. धनाजी भीमा गुंड (वय 36, रा. सुरतगाव, तुळजापूर) व धनंजय विष्णू खताळ (वय 44, गुरसाळे, तुळजापूर) व महादेव (पूर्ण नाव नाही) हे जखमी झाले. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला.

रूपनर, गुंड व खताळ एका मोटारसायकलवर (एमएच 25, एक्स 3282) होते. तर महादेव दुसर्‍या मोटारसायकलवर (एमएच 13, बी बी 7514) होते. तिघे शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्यांच्या पाहुण्यांना भेटून हे तिघे गावाकडे निघाले होते. चालक गंभीर जखमी झाला. दुसर्‍या मोटारसायकलस्वाराची पूर्ण ओळख पटलेली नाही. त्याच्या हातावर महादेव गोंदलेले आहे. तोही गंभीर जखमी आहे. सिव्हिलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद जोडभावी पोलीस चौकीत आहे. माहितीसाठी पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. भोंदे यांच्याशी (8888824030) यांच्याशी संपर्क साधावा.

संग्रहित छायाचित्र