आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी प्रकरणात एकास सात वर्षे सक्तमजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गणपती उत्सवादरम्यान बिअर पिण्यासाठी वर्गणीचे पैसे मागून मारहाण केल्याप्रकरणी मनोज नारायण जाधव (वय 39, रा. लक्ष्मी नरसिंहस्वामी झोपडपट्टी) यास सात वर्षाची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांनी गुरुवारी सुनावली.

बोल्ली मंगल कार्यालयाजवळ सिद्धेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळ आहे. 2 सप्टेंबर 2005 रोजी मंडळाचे अध्यक्ष शरणप्पा मदरी असताना फिर्यादी महादेव गुरपादप्पा बुरकुले यांना तू मंडळाचा अध्यक्ष आहे. जमा केलेल्या वर्गणीतून मला बिअर पिण्यासाठी पैसे दे, अशी मागणी केली. नारायण जाधव याच्यासह त्याच्या मित्रांनी त्यांना दमदाटी केली. पैसे न दिल्याने वाद झाला. संध्याकाळी जाधव व त्याच्या काही मित्रांनी बुरकुले यांना तलवार आणि काठय़ाने मारहाण केली. यात ते खूप गंभीर जखमी झाले. याचा गुन्हा जेलरोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी आज होती. गुरुवारी न्यायालयात युक्तिवाद झाला. यामध्ये शरणप्पा मदरी, सिद्धाराम मदरी, मनोज शिंपाळे आदींची साक्ष घेण्यात आली.

या प्रकरणी सरकारतर्फे अँड. रामदास वागज, आरोपीतर्फे अँड. राजेंद्र बायस यांनी तर मूळ फिर्यादीतर्फे अँड.संतोष न्हावकर, अँड. विकास पाटील आणि अँड.प्रिया जाधव यांनी काम पाहिले.