आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या नगरसेविका निघाल्या गुजरातला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - काश्मीर,गोवा आणि केरळ आदी पर्यटन स्थळं फिरून झाल्यावर यंदा नगरसेविकांचा अभ्यास दौर गुजरातला जाणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असताना दरवर्षी असा दौरा आयोजित केला जातो. यंदाच्या दौऱ्यामुळे मनपाच्या तिजोरीतून ३.२५ लाख रुपये खर्चले जाणार आहेत.

महापालिका महिला बालकल्याण विभागाच्या वतीने दौऱ्यासाठी मनपा अंदाजपत्रकात ३.५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सुरत, जामनेर, जयपूर आदी ठिकाणच्या महानगरपालिका पाहण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगण्यात आले. महिला बालकल्याण समितीपुढे शुक्रवारी हा विषय चर्चेसाठी येणार आहे.

मागील वर्षी सोलापूरच्या नगरसेविकांनी केरळ दौरा केला. त्यात महापौर यांच्यासह ३२ नगरसेविका सहभागी झाल्या होत्या. दौऱ्यात घेतलेली माहिती देण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्याचे ठरले होते, पण ते झाले नाही.