आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Citizen Free From Ses Tax On Petrol And Diesel

सेस करापासून सोलापूरकर मुक्त, महापालिका सभेत निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील मुख्य अंतर्गत रस्ते विकसित करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पेट्रोल व डिझेलवर अधिभार (सेस कर) वसूल केले जात होते. ते कर्ज पूर्ण फिटले असून येथून पुढे एक पैशाचीही वसुली करू नये, अशी मागणी अँड. यू. एन. बेरिया यांनी केली. यावर एकमताने मंजुरी देण्यात आली. सेस कराची पुन्हा वसुली चालू ठेवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी पाठवून दिला होता. ही वसुली थांबल्यानंतर पेट्रोल 80 पैशांनी तर डिझेल 90 पैशांनी स्वस्त होणार आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे शहरातील रस्ते तयार केले. यासाठी महापालिकेने 2006 मध्ये बॅँक ऑफ महाराष्ट्रकडून 10 कोटी 82 लाख रुपये कर्ज घेतले. त्याची मुदत सप्टेंबर 2011 ला संपली. मात्र, कर्जाची पूर्ण परतफेड झाली नाही. राहिलेले एक कोटी 27 लाख रुपये महापालिकेने एकरकमी भरले. दरम्यान, इंधन अधिभार सुरूच राहिला. कर्जाची रक्कम सोलापूरकरांकडून पूर्ण वसूल झालेली असल्याने आता सेस कर पूर्ण बंद होणे गरजेचे असल्याचे वृत्त दिव्य मराठीने 18 जानेवारी रोजी प्रसिध्द केले होते.