आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - आयुक्त काका आमची बाग वाचवा.., बाग वाचवा, पर्यावरण समतोल राखा.., महापौर काकू आमचा आनंद हिरावू नका.. असे फलक लावून जानकीनगर भागातील काही नागरिकांनी बागेसाठी आरक्षित जागा त्वरित संपादन करण्यासाठी महापालिकेसमोर गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले.
महापालिका जाणीवपूर्वक आर्थिक कारण पुढे करीत संबंधित क्षेत्र भूसंपादन करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. जानकीनगर बाग बचाव कृती समितीच्या वतीने हे आंदोलन होत आहे. नगरसेवक नरेंद्र काळे, विशाल गायकवाडसह जानकीनगरमधील नागरिक सहभागी झाले.
आमदार दिलीप माने यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार शिवशरण पाटील, मनपा विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर, नगरसेवक अविनाश पाटील, अशोक निंबर्गी, शैलेंद्र आमणगी, सुभाष कोलदे, संतोष पाटील, हेमंत जैनसह महिला आंदोलनात सहभागी झाले होते.
जानकीनगरातील बागेची जागा मनपाच्या ताब्यात मिळावी म्हणून आम्ही सभागृहात ठराव करून पाठपुरावा केला. त्यात विरोधक राजकारण करत आहेत. आम्ही ती जागा मिळवण्यासाठी आमदार दिलीप मानेंच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत.’’ नागेश ताकमोगे, नगरसेवक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.